अभिनेत्री शहनाझ गिल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटात शहनाझ झळकणार आहे. या चित्रपटाच्या एका ट्रेलर लाँच दरम्यान सलमान खानने शहनाजला मुव्ह ऑन करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर शहनाज व राघवमध्ये अफेअर सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता राघवने मौन सोडलं आहे.

‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत राघवने शहनाझबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर भाष्य केलं. राघव म्हणाला, “इंटरनेटवर सुरू असणाऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत लवकर पोहोचत नाहीत. जोपर्यंत या गोष्टी मी बघत नाही किंवा ऐकत नाही तोपर्यंत त्यात किती तथ्य आहे, हे मी सांगू शकत नाही. मी चित्रपटात काम करण्यासाठी आलो आहे. लोकांनी मला अभिनेता, डान्सर, सूत्रसंचालक म्हणून ओळखावं, असं मला वाटतं. बाकी या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये.”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
difference between shivlinga jyotirlinga
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय?
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा

हेही वाचा>> ‘कबीर सिंग’मधील काम पाहून शाहीद कपूर वनिता खरातला काय म्हणाला? अभिनेत्रीने केला खुलासा

राघवच्या या वक्तव्यानंतर शहनाझ गिलबरोबरच्या त्याच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राघव व शहनाज ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट २१ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा>> सेक्स रॅकेट प्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक!

राघव जुयाल एक उत्तम डान्सर आहे. डीआयडी या रिएलिटी शोमधून त्याला प्रसिद्धी मिळाली. या शोमधील त्याचा स्लो मोशन डान्स फारच लोकप्रिय ठरला होता. त्यानंतर राघवने कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. आता तो ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Story img Loader