Raha Kapoor : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लाडकी लेक राहा कपूर सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असते. या स्टार जोडप्याने २०२३ मध्ये माध्यमांसमोर आपल्या लेकीचा फेस रिव्हिल केला होता. यानंतर राहा कपूर बघता-बघता सोशल मीडियाची फेव्हरेट स्टारकिड झाली. राहाचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. अलीकडेच तिचा दुसरा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. राहा अवघी दोन वर्षांची असल्याने तिचे बोबडे बोल सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहाने ख्रिसमसच्या दिवशी सगळ्या पापाराझींना शुभेच्छा देताना ‘मेरी ख्रिसमस’ म्हटलं होतं. आता राहाचा एक नवीन गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये नेटकऱ्यांना राहा आणि रणबीरचं गोड बॉण्डिंग देखील पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर

राहा-रणबीरचे गोड व्हिडीओ व्हायरल

पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट एकीकडे पिकलबॉल खेळताना दिसतेय. तर, दुसरीकडे राहा आणि रणबीर कपूर एकत्र खेळताना दिसत आहेत. राहा आपल्या बाबाला म्हणते, “ऑन युअर मार्क, गेट सेट गो…गेटअप पापा, गेट सेट गो…” यानंतर रणबीर सुद्धा राहाच्या मागोमाग धावताना दिसत आहे.

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये राहा एकटीच खेळताना काहीशी धडपल्याचं पाहायला मिळतंय. यानंतर ही चिमुकली एकटीच उभी राहिली आणि नंतर बाबाच्या कुशीत जाऊन बसली. रणबीरने लेकीच्या पायाला लागलं तर नाही ना…? याची खात्री करुन घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

रणबीर-राहाच्या या गोड व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “Pookie राहा कपूर”, “राहा-रणबीर बॉण्ड, “बाप-लेकीची सर्वात भारी जोडी”, “या दोघांना खूप-खूप प्रेम”, “रणबीरने डोक्यात राहाचा हेअरबँड सुद्धा घातला आहे”, “राहा खूपच गोड आहे” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा : “२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?

हेही वाचा : शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…

दरम्यान, राहा कपूर ( Raha Kapoor ) केवळ नेटकऱ्यांची नव्हे तर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची देखील फेव्हरेट आहे. करीना कपूर, करिश्मा कपूर, करण जोहर, दिग्दर्शक अयान मुखर्जी हे सगळेजण राहाचं अनेकदा कौतुक करताना दिसतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raha kapoor and ranbir kapoor cute video viral on instagram set father daughter goals sva 00