Happy Birthday Raha Kapoor : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लाडकी लेक राहा आज तिचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी राहाचा जन्म झाला. वर्षभराने ( २०२३ ) ख्रिसमसच्या दिवशी रणबीर-आलियाने आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा पापाराझींसमोर रिव्हिल केला होता. यावेळी कपूर कुटुंबीयांनी एकत्र कॅमेऱ्यासमोर पोझ दिल्या होत्या. यानंतर राहाचे फोटो इंटरनेटवर सर्वत्र व्हायरल होऊ लागले.

राहाचा ( Raha Kapoor ) गोड अंदाज, तिचं रणबीरबरोबरचं बॉण्डिंग, निळेशार डोळे याची इंटरनेटवर सर्वत्र चर्चा रंगली होती. यानंतर राहाने आपल्या आई-बाबांबरोबर राधिका व अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी राहाची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आज दुसऱ्या वाढदिवसानिमित्त रणबीर-आलियाच्या लाडक्या लेकीवर संपूर्ण मनोरंजन विश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Anushka Sharma Wishes Virat Kohli on 36th Birthday with 1st Photo of Son Akay and Vamika with him on Instagram
Virat Kohli Birthday: विराट, वामिका, अकाय…; अनुष्का शर्माने पहिल्यांदाच शेअर केला दोन्ही मुलांबरोबरचा फोटो, कोहलीच्या वाढदिवशी खास पोस्ट
genelia deshmukh impress after seeing beautiful bond between her two sons
Video : रियान अन् राहिलचं बॉण्डिंग पाहून आई जिनिलीया भारावली! देशमुखांच्या सुनेने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”

हेही वाचा : २ वर्षांची झाली राहा कपूर! वाढदिवशी आजीने शेअर केला लाडक्या नातीचा गोंडस फोटो; आत्याची सुद्धा खास पोस्ट

आलिया भट्टने लाडक्या लेकीला ( Raha Kapoor ) शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने राहाच्या जन्मानंतरचा दोन वर्षांपूर्वीचा एक खास फोटो शेअर केला आहे. यामध्ये अवघ्या काही आठवड्यांच्या लेकीला आलियाने आपल्या कुशीत घेतल्याचं आणि रणबीरने या मायलेकींना आपल्या जवळ घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

आलिया लिहिते, “आज दोन वर्षे झाली…आज मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा जाणवतं तू त्यावेळी फक्त काही आठवड्यांची होतीस…ते दिवस पुन्हा यावेत अशी मनापासून इच्छा आहे. पण, माझ्यामते प्रत्येक पालकांची आपल्या मुलांकडून एकच अपेक्षा असते ती म्हणजे, त्यांनी कायम लहान मुलासारखं त्यांच्याजवळ राहावं. तू आमचं संपूर्ण आयुष्य आहेस. तुझ्यामुळे आमचा प्रत्येक दिवस बर्थडे केकसारखा जातो. ( तुझ्यामुळे प्रत्येक दिवस गोड होतो)”

हेही वाचा : चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरसाठी ‘हे’ सीन होते आव्हानात्मक, म्हणाली, “अनिरुद्ध अरुंधतीला हाताला धरून…”

अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह बॉलीवूड कलाविश्वातील सेलिब्रिटींनी भरभरून कमेंट्स करत राहावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, राहाची ( Raha Kapoor ) आजी नीतू कपूर यांनी सुद्धा आलिया, राहा आणि रणबीर या तिघांचा एकत्रित फोटो शेअर करत नातीला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत कपूर कुटुंबीय अतिशय गोड दिसत आहेत. नीतू यांनी या फोटोला “Our Pyaar’s Birthday देव तुझ्या सदैव पाठिशी राहो” असं कॅप्शन दिलं आहे.

Story img Loader