Raha Kapoor : २५ डिसेंबर २०२४ म्हणजेच, आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या सेलिब्रिटी जोडप्याने आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा माध्यमांसमोर रिव्हिल केला होता. त्या दिवसापासून इंटरनेटवर सर्वत्र राहाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होऊ लागले होते. गेल्यावर्षी ख्रिसमसनंतर, यंदा थेट मार्चमध्ये जामनगरला अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात नेटकऱ्यांनी राहाची झलक पाहायला मिळाली होती. या वर्षभरात राहा सर्वांची फेव्हरेट स्टारकिड म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी राहाच्या आई-बाबांनी तिची ओळख संपूर्ण जगाला करून दिली होती. आज बरोबर एक वर्षांनी या चिमुकल्या राहाने ख्रिसमसच्या दिवशी माध्यमांसमोर येऊन उपस्थित सगळ्या पापाराझींना चक्क ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नाही तर, लाडक्या बाबाच्या कडेवर परत जात असताना… तिला सर्वांनी ‘हाय राहा…हाय राहा’ असा आवाज दिला. हा आवाज ऐकताच, आलियाच्या लेकीने सर्वांना प्रेमळ अंदाजात ‘हाय’ करून गोड अशी फ्लाइंग किस देखील दिली.

हेही वाचा : ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ची फी किती? आकडा ऐकून थक्क व्हाल! ऐश्वर्या रायची लेक, शाहरुखचा मुलगा आहे या शाळेचा विद्यार्थी

राहा कपूरचा गोंडस अंदाज ( Raha Kapoor )

राहाचे हे गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत. तिचा हा क्युट अंदाज पाहून सगळे जण भारावून गेले आहेत.

राहा कपूरने पापाराझींना दिल्या ‘अशा’ शुभेच्छा

सुरुवातीला राहाची ( Raha Kapoor ) आई अभिनेत्री आलिया भट्ट पापाराझींसमोर आली. तिने सर्वांना, “शांत बसा…नाहीतर राहा घाबरेल” अशी विनंती केली. यानंतर लाडक्या लेकीला कडेवर घेऊन रणबीर माध्यमांसमोर आला. राहाची एन्ट्री होताच ती पटकन ‘हाय मेरी ख्रिसमस’ असं म्हणाली. लेकीचे बोबडे बोल ऐकून आलिया-रणबीर देखील भारावून गेले होते. यानंतर सर्वांना अभिवादन करून कपूर कुटुंबीय पार्टीला निघाले. तेव्हा सगळेजण राहाला आवाज देऊ लागले. यादरम्यान, गोंडस राहाने सर्वांना ‘हाय’ करत फ्लाइंग किस दिल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : सिनेमा हाऊसफुल, तरीही थिएटर नाहीत…; तेजश्री प्रधानची खंत! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटासाठी पोस्ट करत म्हणाली…

हेही वाचा : Aamir Khan : आमिर खानचं नाना पाटेकरांच्या प्रश्नाला उत्तर, “मी पुरस्कार सोहळ्यांना जात नाही, कारण दोन भिन्न भूमिकांची तुलना…”

नेटक्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. राहाचे ( Raha Kapoor ) बोबडे बोल ऐकून सर्वजण भारावून गेल्याचं कमेंट्स वाचून स्पष्ट होत आहे. दरम्यान, राहाचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला. यानंतर वर्षभराने आलिया-रणबीर लेकीचा चेहरा सर्वांसमोर रिव्हिल केला होता. तर, यंदा या दोन वर्षांच्या चिमुकलीने सर्वांना शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे.