Alia Bhatt And Raha Kapoor : आलिया भट्ट व रणबीर कपूर यांच्या गोंडस लेकीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू असते. नोव्हेंबर २०२२ मध्ये अभिनेत्रीने राहा कपूरला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर साधारण वर्षभराने आलियाने तिचा चेहरा माध्यमांसमोर रिव्हिल केला. ख्रिसमसच्या दिवशी आलिया, रणबीर आणि चिमुकली राहा यांनी एकत्र मिळून कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या होत्या.

राहाचा चेहरा माध्यमांसमोर रिव्हिल केल्यावर इंटरनेटवर सर्वत्र आलिया-रणबीरची चिमुकली राजकुमारी व्हायरल झाली होती. नेटकऱ्यांनी राहा नेमकी कोणासारखी दिसते याचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली होती. रिद्धिमा कपूर- साहनी, करीना कपूर, नीतू कपूर यांच्या मते राहा तिच्या आईसारखी आणि काही अंशी तिचे आजोबा व दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासारखी दिसते. मात्र, काही असलं तरी, राहाचा गोड अंदाज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच

हेही वाचा : Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकरला भाऊच्या धक्क्यावर नो एन्ट्री! शिक्षेची आठवण करून देत रितेश देशमुख म्हणाला…

पापाराझींना पाहताच आलिया भट्टने केलं असं काही…

बॉलीवूडची स्टार अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच राहासह ( Raha Kapoor ) काश्मीरहून परतली. अभिनेत्री सध्या ‘अल्फा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. आलिया लेकीसह रविवारी ( १ सप्टेंबर ) मुंबईच्या प्रायव्हेट विमानतळावर दिसली. यावेळी राहा आईच्या कडेवर झोपली होती. एअरपोर्टवर पापाराझींना पाहताच आलियाने राहा झोपलीये असा इशारा करत सर्वांना प्लीज शांत राहा आणि आवाज करू नका असं खुणावलं. यावेळी आलियाने फुल स्लीव्हज असलेला काळ्या रंगाचा टॉप घातला होता. तर, पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये राहा खूपच क्यूट दिसत होती. ती गाढ झोपेत असल्याने आलिया विमानतळावर लाडक्या लेकीची खूप काळजी घेताना दिसली.

 Raha Kapoor
आलिया भट्ट व राहा कपूर ( Raha Kapoor ) ( फोटो सौजन्य : varindertchawla )

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्या नातीची गगनभरारी! भारतातील सर्वोच्च संस्थेत शिक्षणासाठी मिळवला प्रवेश, फोटो पोस्ट करत म्हणाली…

राहा कपूरची ( Raha Kapoor ) सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे. कपूर घराण्यात ती सर्वांचीच लाडकी आहे. याशिवाय आलियाच्या ‘अल्फा’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, ‘YRF स्पाय युनिव्हर्स’मध्ये आलिया भट्टसह ‘मुंज्या’ फेम शर्वरीची एन्ट्री झाली आहे. यापूर्वीच्या ‘YRF स्पाय युनिव्हर्स’मधील चित्रपटांमध्ये ‘पठाण’ आणि ‘टायगर’ने एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ केले होते. त्यामुळे आलियाच्या ‘अल्फा’ चित्रपटात दोन सुपरस्टार कॅमिओ म्हणून एन्ट्री घेणार की नाही हे पाहणं देखील उत्सुकेचं ठरेल.

Story img Loader