Raha Kapoor Video : बॉलीवूडमधल्या बहुचर्चित स्टारकिड्सपैकी एक आहे राहा कपूर. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टची ही गोंडस लेक नेहमी चर्चेत असते. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होतं असतात. राहाचा गोंडसपणा हा नेहमी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं असतो. अलीकडेच तिचा चालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. राहाला पहिल्यांदाच चालताना पाहून रणबीर-आलियाच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला होता. नुकताच तिचा काका अयान मुखर्जीबरोबरचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

अयान मुखर्जी व राहा कपूरचा ( Raha Kapoor ) व्हिडीओ ‘फिल्मीग्यान’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, काका अयान मुखर्जी आणि आई आलिया भट्टसह राहा फिरायला निघाल्याचं दिसत आहे. काळ्या गाडीमध्ये राहा अयान मुखर्जीच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. तर बाजूला आलिया भट्ट पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमधील राहाच्या गोड अंदाजाने पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने पायावर काढला नवा टॅटू, पाहा व्हिडीओ

राहाच्या ( Raha Kapoor ) या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “आता राहा खूप मोठी झाली आहे. रणबीर-आलिया हिला काय खाऊ घालता?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “बेबी डॉल.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “क्यूटी पाई राहा.”

पाहा राहा कपूरचा गोड व्हिडीओ ( Raha Kapoor Video )

याआधी अयान मुखर्जी व राहा कपूरचा ( Raha Kapoor ) गाडीतून फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत, निळ्या रंगाच्या गाडीतून राहा काका अयान मुखर्जीबरोबर फिरताना दिसली होती. पांढऱ्या रंगाच्या सुंदर अशा फ्रॉकमध्ये राहा पाहायला मिळाली होती. तसंच या गाडीत राहा एका मोठ्या फुग्याबरोबर खेळताना पाहायला मिळाली होती.

हेही वाचा – Devara Part – 1 : ज्युनियर एनटीआर-जान्हवी कपूरचं रोमँटिक गाणं संगीतकाराने केलंय कॉपी? नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “काही वर्षांपूर्वी…”

दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट २०२२मध्ये लग्नबंधनात अडकले आणि त्यानंतर त्याचवर्षी ६ नोव्हेंबरला राहाचा जन्म झाला. रणबीर-आलियाने आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा चाहत्यांपासून एक वर्ष लपवला होता. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर दोघांनी राहाची पहिली झलक दाखवली. तेव्हापासून राहाचे गोड फोटो, व्हिडीओ सतत व्हायरल होतं असतात.

Story img Loader