Happy Birthday Raha Kapoor : सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांपेक्षा त्यांच्या लाडक्या लेकीची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा असते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर १४ एप्रिल २०२२ रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधत आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. अभिनेत्रीला त्याचवर्षी ६ नोव्हेंबरला कन्यारत्न झालं. पुढे, काही दिवसांनी आलिया-रणबीरने त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव राहा असं ठेवलं.
राहाची ( Raha Kapoor ) पहिली झलक पाहण्यासाठी रणबीर-आलियाचे लाखो चाहते उत्सुक होते. अखेर गेल्यावर्षी ख्रिसमिसच्या दिवशी या जोडप्याने राहाचा चेहरा पापाराझींसमोर रिव्हिल केला. यानंतर इंटरनेटवर राहाचा गोंडस अंदाज, तिचे निळे डोळे, गुबगुबीत गाल, ती नेमकी कोणासारखी दिसते? रणबीरचं त्याच्या लेकीशी असलेलं नातं या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊ लागली. राधिका व अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुद्धा राहा आपल्या आई-बाबांसह पोहोचली होती. तिची क्रेझ दिवसेंदिवस वाढू लागली आणि आता ही चिमुकली सर्वांची फेव्हरेट झाली आहे.
आलिया भट्टची लाडकी लेक राहा ( Raha Kapoor ) आज दोन वर्षांची झाली आहे. यानिमित्ताने आज तिच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. राहासाठी खास पोस्ट शेअर करत सर्वात आधी तिच्या आत्याने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. रिद्धिमा कपूर साहनीने तिची लेक समाराबरोबरचा राहाचा क्यूट फोटो शेअर केला आहे. यामध्ये राहा गोड स्माइल देताना दिसत आहे. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा क्यूटी, आम्हा सर्वाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं रिद्धिमाने या फोटोला कॅप्शन दिलं आहे.
राहाची आजी नीतू कपूर यांनी आलिया, राहा आणि रणबीर या तिघांचा एकत्रित फोटो शेअर करत नातीला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत कपूर कुटुंबीय अतिशय गोड दिसत आहेत. नीतू यांनी या फोटोला “Our Pyaar’s Birthday देव तुझ्या सदैव पाठिशी राहो” असं कॅप्शन दिलं आहे.
नीतू कपूर यांनी लाडक्या नातीसाठी ( Raha Kapoor ) पोस्ट शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अगदी कमेंट्स सेक्शनमध्ये पापाराझींनी देखील राहाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd