चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयी चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. चित्रपटातील भूमिकांशिवाय त्यांच्या खासगी आयुष्यात ते कसे राहतात, कसे वागतात, त्यांची दिनचर्या काय असते इथपासून ते ऑनस्क्रीन काम करणाऱ्या इतर कलाकरांबरोबर त्यांचे नाते कसे आहे, त्यांच्या कुटुंबात कोण असते; अशा अनेक बाबींबद्दल चाहत्यांना उत्सुकता असते. याबरोबरच कलाकारांच्या मुलांविषयीदेखील जाणून घेण्यास चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. महत्वाचे म्हणजे, अवघ्या काही वर्षांच्या या मुलांचा मोठा चाहतावर्गही निर्माण झाल्याचे दिसते. असाच काहीसा प्रकार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लाडकी लेक राहा कपूर(Raha Kapoor)च्या बाबतीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकताच रणबीर कपूर आपल्या लाडक्या लेकीसह नवीन घराचे बांधकाम पाहायला गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये अगदी काही सेकंद राहा रणबीरबरोबर दिसत असून त्यानंतर तो तिला गाडीमध्ये देऊन स्टाफबरोबर पुन्हा बांधकाम होत असलेल्या घरात जात असल्याचे दिसत आहे. राहा अगदी काही वेळासाठी या व्हिडीओमध्ये दिसत असली तरीही चाहत्यांनी ‘सुंदर’, ‘वडील आणि मुलगी दोघेही छान दिसतात’ अशा कंमेट केल्या आहेत. याआधीदेखील राहा आपल्या वडिलांसोबत या बांधकामाच्या ठिकाणी दिसली होती. त्यावेळी आलिया आणि नीतू कपूरदेखील त्यांच्यासोबत होत्या.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

हेही वाचा: Bigg Boss OTT3 : वाइल्ड कार्ड स्पर्धकाने घरात एंट्री घेताच मोडला ‘हा’ महत्त्वाचा नियम; बिग बॉसने पहिल्याच दिवशी…

Raha Kapoor ला पाहिल्यानंतर काय म्हणाले होते चाहते?

अवघ्या दीड वर्षाच्या राहाचे लाखो चाहते आहेत. तिची एक झलकदेखील चाहत्यांसाठी पर्वणी असते. राहाचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला होता. त्यानंतर २०२३ च्या ख्रिसमसला रणबीर आणि आलिया यांंनी तिचा चेहरा संपूर्ण जगाला दाखवला होता. तिला पाहिल्यानंतर ऋषी कपूरची आठवण येत असल्याचे चाहत्यांनी म्हटले होते. ती हुबेहूब लोकप्रिय अभिनेते ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचे नेटकऱ्यांनी मत मांडले होते. याबरोबरच, अभिनेत्री आलिया भट्टदेखील अनेकदा राहाबद्दल गोष्टी सांगताना दिसते. एका मुलाखतीदरम्यान तिने राहाच्या दिनचर्येबद्दल सांगितले होते. राहाला दररोज पुस्तकातील गोष्टी वाचून दाखवणे आणि तिला बाहेर घेऊन जाणे, तिच्याबरोबर वेळ घालवणे या रोजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या गोष्टी असल्याचे म्हटले होते. याबरोबरच राहाने तिच्या आयुष्यात ज्या गोष्टींमुळे तिला अवघडलेपण वाटते, त्या गोष्टी करू नयेत. तिला ज्या गोष्टी सहज वाटतील त्याच तिने कराव्यात, असे आलियाने म्हटले होते.

पिंकविला इन्स्टाग्राम

दरम्यान, आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल २०२२ ला लग्नगाठ बांधली आहे. नुकतीच ही जोडी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला पोहोचली होती, त्यावेळी त्यांनी पापाराझींसाठी पोझदेखील दिली.

Story img Loader