Rahul Roy Sister Pia Grace Roy : विनोद खन्ना, बरखा मदानसारख्या काही बॉलीवूड सेलिब्रिटींनी ग्लॅमर सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. यात आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ते नाव आहे अभिनेता राहुल रॉयच्या बहिणीचे आहे. ‘आशिकी’ चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर सुपरस्टार बनलेल्या राहुल रॉयची मानलेली बहीण पिया ग्रेस रॉय एकेकाळी मॉडेल होती आणि नंतर ती बिझनेसवुमन बनली. पण नंतर तिने या सर्व गोष्टींचा त्याग करून आध्यात्माचा मार्ग निवडला. पिया ही विवाहित असून पतीबरोबर राहते.

प्रसिद्ध मॉडेल असण्याबरोबरच पिया टॅलेंट मॅनेजमेंट फर्म देखील सांभाळत होती. सोशल मीडियावरही तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. पण नंतर तिने सर्व काही सोडून ब्रह्मचारी होण्याचा निर्णय घेतला आणि आपलं नाव देखील बदलले. पियाने आता तिचे नाव हरी माँ प्रियांका ठेवले आहे. तिचा भाऊ राहुल रॉय अनेकदा त्याला भेटायला जात. तो आपल्या बहिणीलाही आपली गुरु मानतो. रक्षाबंधनला दोघांचा फोटो पाहायला मिळाला होता. राहुल रॉयने स्वत: त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला होता. ‘रक्षाबंधनाच्या शुभेच्छा हरी माँ, माझी बहीण, माझी गुरु हरी माँ प्रियंका’, असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं होतं.

राहुल रॉय व हरी माँ प्रियांका (फोटो – इन्स्टाग्राम)

Stree 2 OTT Release: श्रद्धा कपूरचा ब्लॉकबस्टर ‘स्त्री २’ ओटीटीवर दाखल, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

पियाचा पती कोण?

पियाचे इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहिल्यास तिची मॉडेल म्हणून शेवटची पोस्ट २०२० ची आहे. पियाने रोमर सेनशी लग्न केलं आहे. ती स्वतःला विवाहित ब्रह्मचारी म्हणते. तिचा नवराही तिच्या यात पाठिंबा देतो. दोघे अनेकदा एकत्र फोटो शेअर करतात. पियाचा नवरा रोमर ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आणि ऑटोमोबाईल व हॉटेल समीक्षक आहे. पिया एक गायिका देखील आहे आणि ती मार्शल आर्ट देखील शिकली आहे.

Kaun Banega Crorepati 16: २२ वर्षीय स्पर्धकाने ७ कोटींच्या ‘या’ प्रश्नावर सोडला खेळ; तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

राहुल रॉय व पिया यांच्यातील खास नातं

राहुल रॉयने ‘आशिकी’ चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि राहुल रॉय मोठा स्टार बनला. त्याने १० दिवसांत ४७ चित्रपट साईन केले होते, पण त्यापैकी त्याचे अनेक चित्रपट सुरू होण्यापूर्वीच बंद झाले आणि अनेक चित्रपट फ्लॉप झाले. राहुलने त्याच्या संपूर्ण करिअर एकच हिट चित्रपट दिला. त्यानंतर राहुल रॉय बिग बॉसमध्ये सहभागी झाला होता आणि त्याने या शोची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर एकदा राहुलला अर्धांगवायूचा झटका आला, तेव्हा त्याची मानलेली बहीण पिया त्याची सेवा करण्यासाठी पुढे आली. तिने रात्रंदिवस त्याची सेवा केली होती. राहुल तिला मनापासून आपली बहीण मानतो. राहुल पियाला आपली गुरु म्हणतो.