राज कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अविस्मरणीय आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यातील एक म्हणजे ‘राम तेरी गंगा मैली’. या चित्रपटात अभिनेत्री मंदाकिनीने अतिशय बोल्ड भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धीही मिळाली. या चित्रपटाची गाणीही सुपरहिट ठरली. मात्र गंगा पात्रासाठी मंदाकिनी राज कपूर यांची पहिली पसंत नव्हती. त्यांना या चित्रपटात गंगाची भूमिका दुसऱ्या नायिकेला द्यायची होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- “आमिर खान माझा चांगला मित्र होता, पण..”; कंगनाची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “हृतिक रोशन…”

या चित्रपटासाठी राज कपूर यांची पहिली पसंती पद्मिनी कोल्हापूरे होत्या. मंदकिनी यांनी ४५ दिवस ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाचे चित्रीकरण केल्या नंतर जर राज कपूर पद्मिनीकडे गेले आणि त्यांनी पद्मिनींना चित्रपट ऑफर केला. मात्र, त्या चित्रपटातील चुंबनदृश्य जास्त असल्याने त्यांनी चित्रपटाला नकार दिला. पद्मिमनी कोल्हापूरेंनी एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. शेवटी मंदाकिनी यांनीच या चित्रपटात गंगाची भूमिका साकारली. गंगा या भूमिकेमुळे मंदाकिनी रातोरात सुपरस्टार झाल्या. या चित्रपटातून त्यांनी प्रत्येकाची मने जिंकली.

हेही वाचा- Video : आनंदाच्या भरात रणबीर कपूरने सगळ्यांसमोर घेतले बॉबी देओलचे चुंबन; म्हणाला, “तू…”

पद्मिनी यांनी अनेक मोठ्या-मोठ्या चित्रपटांना नकार दिला होता. ‘एक दुजे के लिये’मधील रती अग्निहोत्री, ‘सिलसिला’मधील रेखा आणि ‘तोहफा’मधील श्रीदेवी यांनी साकारलेल्या भूमिका मला ऑफर झाल्या होत्या असं त्या अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. शिवाय ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट सोडल्याचं वाईटही वाटत होतं असंही त्यांनी मान्य केलं होतं.