अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा हे त्यांच्या कामापेक्षा जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. नुकताच शिल्पानेतीच्या लेकीचा दुसरा वाढदिवस दणक्यात साजरा केला. वाढदिवस त्यांच्या मुलीचा असला तरी ट्रोल मात्र राज कुंद्रा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय राहून नेहमीच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असते. आता त्यांच्या मुलीच्या तिसऱ्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. यात लेकीच्या ग्रँड बर्थडे पार्टीने सर्वांचं लक्ष वेधलच पण त्यामुळे राज कुंद्रा देखील वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

आणखी वाचा : Video: यामी गौतमचा अनोखा अंदाज! केली कंगना रणौतची मिमिक्री, प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली…

लेक समीशा हिच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शिल्पाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या जंगी पार्टीत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटी किड्सनेही हजेरी लावली होती. पेपा पीग या कॉर्टूनवर आधारित थीम ठेवण्यात आली होती. पेपा पीगची खेळणी, चालते बोलते बाहुले या बर्थडे पार्टीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. फोटोबूथ, सेल्फीपॉइंट, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स या सगळ्याचा बच्चेकंपनी आनंद लुटत असल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओत समीशा, शिल्पाचा मुलगा वियान, शमिता, शेट्टी राज कुंद्रा एन्जॉय करताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे यावेळी राज कुंद्राने कुठलाही मास्क परिधान केला नव्हता.

हेही वाचा : Video: “हा पिझ्झा तुमच्यासाठी…”; शिल्पा शेट्टीने मुंबईत सुरू केला नवीन कॅफे पण लक्ष वेधलं तिच्या वागणुकीने

दरवेळी लोकांच्या समोर येताना वेगवेगळे मास्क घालणारा राज लेकीच्या वाढदिवसाच्या पार्टीत विना मास्क असल्याने लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. एकाने लिहिलं, “आज राज चक्क विना मास्क कसा?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “दिसला! आम्हाला राजचा चेहरा दिसला.” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “याच्या मुलीच्या वाढदिवसाला इतकी सगळी लोकं आली आहेत. पण तरीही आज हा मास्क घालायला विसरला वाटतं!” त्यामुळे वाढदिवस जरी शिल्पा-राज यांच्या मुलीचा असला तरीही राज कुंद्रा मात्र चांगलाच ट्रोल होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kundra gets troll for not wearing any mask in his daughters birthday party rnv