मध्यंतरी ‘मीटू’ प्रकरणामुळे डोकं वर काढल्याने बऱ्याच लोकांची नावं पुन्हा चर्चेत आली. त्यापैकीच दोन नावं म्हणजे शर्लिन चोप्रा आणि राज कुंद्रा. शर्लिनने बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेणाऱ्या साजिद खानवर बरेच आरोप केले याचबरोबर तिने राज कुंद्रावरही आरोप केले तसेच त्याच्याविरुद्ध तक्रार देखील नोंदवली. पॉर्न चित्रपटांच्या निर्मिती प्रकरणी राज कुंद्रा याला अटक झाली आणि त्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला. शर्लिनच्या आरोपाने पुन्हा त्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली.

नुकतंच राज कुंद्राने याबाबत मौन सोडलं आहे. शर्लिनच्या ‘ओन्ली फॅन्स’च्या व्हिडिओबाबत एका ट्विटर यूझरला प्रतिक्रिया देताना त्याने शर्लिनवर टीका केली आहे. शर्लिनच्या अश्लील ‘ओन्ली फॅन्स’ या प्लॅटफॉर्मवरील अश्लील व्हिडिओ संदर्भात एका ट्विटर यूझरने राज कुंद्राला टॅग करून ट्वीट केलं होतं. त्यावर राजने शर्लिनला उद्देशून प्रतिक्रिया दिली आहे.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”

आणखी वाचा : अभिनेत्री सायली संजीवची सुबोध भावेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट चर्चेत, म्हणाली…

राज म्हणाला, “तिने तिच्या ‘ओन्ली फॅन्स’ प्लॅटफॉर्मवर ज्या पद्धतीचे अश्लील व्हिडिओ शूट केले आहेत त्यासाठी ती कोणाला जबाबदार धरणार आहे? एकीकडे ती अश्लीलता आणि महिला हक्काबद्दल बोलते, आणि दुसरीकडे ती असे कित्येक अश्लील व्हिडिओ बनवत आहे. तिला लवकरच अटक होईल, ती समाजासाठी घातक आहे.”

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शर्लिनने राज आणि त्याची पत्नी, अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात फसवणूक आणि मानसिक छळा केल्याची तक्रार केली होती. पॉर्न चित्रपट निर्मितीवरून राजची तेव्हा कसून चौकशी सुरू होती. राजने तेव्हा त्याच्या बचाव करताना हा फक्त प्रौढ लोकांसाठी चित्रपट आहे यात काहीच अश्लील नाही असं स्पष्टीकरणही दिलं होतं. नंतर हे प्रकरण आणखी चिघळलं आणि त्या बदल्यात राज आणि शिल्पाने शर्लिनविरुद्ध ५० कोटींचा अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला आणि सार्वजनिक शर्लिनने जाहीररित्या माफी मागायची मागणीदेखील केली.

Story img Loader