शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा हे बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपं आहे. शिल्पा व राज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. शिल्पा मुलं आणि पतीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. आता शिल्पाच्या पतीने केलेली अशीच एक पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या व शिल्पाच्या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केलेली पोस्ट ही तो शिल्पावर किती प्रेम करतो, याबद्दलची आहे. राजने त्याचा व शिल्पाचा एक फोटो शेअर केला, त्याबरोबर एक व्हॉट्सअॅप चॅटचा फोटोही होता. त्या चॅटमध्ये शिल्पा विचारते ‘बेबी, तू माझ्यावर किती प्रेम करतोस’ त्यावर राज ‘७२%’ असं उत्तर देतो. ‘१०० % का नाही?’ असं शिल्पा विचारते. मग ‘लक्झरी वस्तूंवर २८% टक्के जीएसटी’ असं राज उत्तर देतो. राजने हसणारा इमोजी पोस्ट करत ही स्टोरी शेअर केली होती.

पती नुपूर शिखरेपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे आयरा खान; आमिर खानची लेक २६ वर्षांची, तर जावई…

राज कुंद्राची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, शिल्पा शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘सुखी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती. लवकरच ती रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सीरिजमध्ये झळकणार आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, इशा तलवार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. तर राज कुंद्राबद्दल बोलायचं झाल्यास त्याने पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर तुरुंगात घालवलेल्या दिवसांवर आधारित ‘UT 69’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पण हा चित्रपट फार चांगली कामगिरी करू शकला नव्हता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kundra post about how much he loves shilpa shetty gst on luxury items hrc