Raj Kundra Reacts on alleged Connection with Riya Barde: ठाण्यातील उल्हासनगरमधून पोलिसांनी नुकतीच एका बांगलादेशी पॉर्नस्टारला अटक केली आहे. रिया बर्डे उर्फ ​​आरोही बर्डे उर्फ ​​बन्ना शेख असे तिचे नाव आहे. ती नाव आणि ओळख बदलून रिया भारतात राहत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तिने बनावट कागदपत्रे वापरून भारतीय पासपोर्ट मिळवला आणि ती भारतीय नसून बांगलादेशी नागरिक आहे. या रिया बर्डे प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचं नाव आलं होतं. आता त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रियाने राज कुंद्राच्या प्रॉडक्शनने केलेल्या काही प्रकल्पांमध्ये काम केले होते, असा दावा केला जात होता. त्यानंतर आता राज कुंद्राने या प्रकरणावर मौन सोडलं आहे. हे सर्व दावे खोटे आहेत, असं राजने ‘हिंदुस्थान टाइम्स’शी बोलताना सांगितलं. “माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या बातम्यांमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. एक व्यक्ती जी कथित स्थलांतरित आहे आणि बेकायदेशीरपणे भारतात राहतेय ती माझ्यासाठी काम करत होती किंवा माझ्या प्रॉडक्शन कंपनीशी संबंधित होती असं म्हटलं जात आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी या व्यक्तीला कधीही भेटलो नाही किंवा या व्यक्तीने काम केलेल्या कोणत्याही प्रॉडक्शन कंपनीशी माझा संबंध नाही,” असं राज म्हणाला.

Pravin Tarde : धर्मवीर २ बाबत सुषमा अंधारेंची खोचक पोस्ट, प्रवीण तरडेंचं रोखठोक उत्तर; “आधी सिनेमा…”

हे सगळे दावे खोटे असून ते आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवत आहेत, असं राजने नमूद केलं. “हे तथ्यहीन दावे माझ्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवत आहेत. तसेच मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी माझ्या नावाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी माझे काम अत्यंत चोखपणे करतोय आणि मी असे खोटे आरोप अजिबात सहन करणार नाही,” असं राज कुंद्रा म्हणाला.

राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी (फोटो – इन्स्टाग्राम)

२ कोटींचे कर्ज, मुलाच्या शाळेबाहेर भाजीपाला विकला; प्रसिद्ध अभिनेता ‘तो’ प्रसंग सांगताना झाला भावुक, म्हणाला, “लोक मला वेडा…”

राजचे वकील प्रशांत पाटील यांनी म्हटलं की या प्रकरणातील कथित आरोपीचे नाव शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राज कुंद्रा यांच्या प्रॉडक्शन टीमशी जोडले जात आहे, पण या गोष्टी खोट्या आहेत. माझ्या क्लायंटची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत. या दोघांचा तिच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काहीच संबंध नाही. तसेच बदनामी करण्याच्या उद्देशाने खोट्या गोष्टी पसरवणाऱ्या लोकांविरोधात गुन्हा दाख केला जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.