अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. १९ जुलै २०२१ रोजी त्याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता लवकरच राज कुंद्रावर चित्रपट येणार आहे. ‘UT69’ असे त्या चित्रपटाचे नाव आहे. राज कुंद्राने मध्यंतरी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत या चित्रपटाच्या तारखेची घोषणा केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सार्वजनिक ठिकाणी तसेच मीडियासमोर येताना राज कुंद्रा कायम मास्क घालून समोर यायचा. त्याच्या या मास्कवरुन व त्याला अटक झाल्यानंतर लोकांनी प्रचंड ट्रोल केलं. आता नुकतंच त्याच्या ‘UT69’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचदरम्यान राज कुंद्राने प्रथमच मास्क काढून तो लोकांना सामोरा गेल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणावर लवकरच येणार चित्रपट; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या ट्रेलर लॉंचदरम्यान राजने एकूणच या अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. मास्क घालायची वेळ त्याच्यावर का आली अन् त्याच्या कुटुंबाला मीडिया ट्रायलचा नेमका कसा त्रास झाला यावर सविस्तरपणे भाष्य केलं आहे. “जे काही बोलायचंय ते मला बोला, माझ्या बायकोला, मुलांना, परिवाराला यामध्ये आणू नका.” असंही राज भावुक होऊन म्हणाला.

मीडियाशी संवाद साधताना राज म्हणाला, “हा मास्क वापरावा लागणं हीच माझ्यासाठी फार दुर्दैवी व दुःखद गोष्ट होती. माझ्या कोर्टातील खटल्यापेक्षा मीडियामधून चालवला गेलेला खटला हा फार वेदनादायक होता. याचा दोष मी तुम्हाला देणार नाही. माझा जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हाच मी हा मास्क काढेन असा निर्धार मी मनाशी केला होता. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, सत्य लवकरच लोकांसमोर येईल.”

मीडियाशी संवाद साधताना राजला अश्रु अनावर झाले अन् तो भावुक होत पुढे म्हणाला, “ही संपूर्ण गोष्ट माझ्या कुटुंबासाठी फार वेदनादायक होती. जे बोलायचं आहे ते मला बोला.माझी बायको, मुलं कुटुंबाबद्दल बोलू नका, त्यांनी तुमचं काय बिघडवलं आहे.” असं सांगताना राज कुंद्रा फारच भावुक झाला. राजच्या ‘UT 69’ या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन शाहनवाज अली यांनी केलं आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kundra removes mask first time infront of media at ut 69 movie trailer launch avn