अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या चांगलाच चर्चेत आहे. लवकरच राज कुंद्राच्या जीवनावर आधारित ‘यूटी ६९’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शन सोहळ्यात पहिल्यांदाच राज कुंद्राने चेहऱ्यावरील मास्क काढून माध्यमांबरोबर संवाद साधला. यावेळी त्याने आर्थर रोड तुरुंगातील अनुभव शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Video: “देशात दोन गोष्टी विकल्या जातात सेक्स आणि…”, राज कुंद्राचं वक्तव्य चर्चेत

राज कुंद्रा म्हणाला, “आर्थर रोड हे तुरुंग नाही, ते नजरकैदेत ठेवण्याचं केंद्र आहे. इथे तुम्ही फक्त आरोपी असला तरी तुम्हाला एका गुन्हेगारापेक्षा वाईट वागणूक दिली जाते, मला हे बिलकूल आवडले नाही. अशा गोष्टींना सुधारण्याची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आर्थर रोड तुरुंगातील ते दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. माझी पत्नी आणि माझ्या कुटुंबीयांनी मला या कठीण दिवसांवर मात करण्यासाठी मदत केली. ते ६३ दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होते. असे दिवस कोणाच्याही वाट्याला येऊ नये, पाहू नयेत यासाठी मी प्रार्थना करतो. कारण तुरुंग ही या पृथ्वीवरची सगळ्यात भयानक जागा आहे.”

२०२१ मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. अश्लील ओटीटी ॲपच्या माध्यमातून पॉर्नोग्राफी सामग्री वितरित केल्याचा आरोप त्याच्यावर होता. याच प्रकरणात त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता. राज कुंद्राने आर्थर रोड तुरुंगात घालवलेल्या दिवसांवर लवकरच चित्रपट येणार आहे. ३ नोव्हेंबरला त्याचा बायोपिक ‘यूटी ६९’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राज कुंद्राच मुख्य भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kundra revealed about jail trauma called it worst place on earth dpj
Show comments