बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी दरवर्षी करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसतात. या वर्षीही अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह अभिनेत्रींनीही करवा चौथ साजरी केली. नेहमी करवा चौथनिमित्त शिल्पा शेट्टीची चर्चा होताना दिसते. परंतु यावेळी मात्र शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची सर्वत्र चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोर्नोग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्रा घराबाहेर पडताना त्याचा चेहरा लपवतो. कधी मास्क तर कधी हटके पर्यायाचा वापर तो चेहरा लपवण्यासाठी करतो. परंतु यावेळी मात्र चक्क त्याने चाळणीचा वापर केला. करवा चौथसाठी शिल्पा शेट्टीच्या चाळणीने चेहरा लपवत तो अनिल कपूर यांच्या घरी पोहोचला. त्याच्या चाळणीवर ‘SSK’ हे शिल्पा शेट्टीच्या नावाचे इनिशिअल्स लिहिले होते. करवा चौथसाठी बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांच्या घरी शिल्पा शेट्टीसह अनेक सेलिब्रिटी जमले होते.

हेही वाचा >> “प्लास्टिक सर्जरी केली आहे का?”, श्रुती हसन म्हणाली “माझ्या नाकाची…”

हेही वाचा >> अंकिता लोखंडे पहिल्यांदाच दिसणार मुख्य भूमिकेत, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातील फर्स्ट लूक समोर

राज कुंद्राचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूडच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी राज कुंद्राला ट्रोल केलं आहे. “चांद छुपा बादल मे”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर दुसऱ्याने “चाळणीने चेहरा लपवत आहे. मस्त मास्क आहे”, असं कमेंट करत म्हटलं आहे.

हेही पाहा >> Video : ‘झिंगाट’ गाण्यावर गश्मीर महाजनीसह बेभान होऊन नाचला सिद्धार्थ मल्होत्रा, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

शिल्पा शेट्टीने करवा चौथसाठी खास लाल रंगाच्या साडीत पेहराव केला होता. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन करवा चौथ सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. राज कुंद्राबरोबरचा खास फोटोही तिने शेअर केला आहे.  

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kundra troll for using shilpa shetty sieve to hide face karva chauth celebration video viral kak