शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतच राज कुंद्राने अभिनय क्षेत्रात पदापर्ण केलं आहे. काल (३ नोव्हेंबरला त्याचा बायोपिक युटी ६९ प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू फिकी पडलेली दिसून येत आहे. नुकतंच एका मुलाखतीत राज कुंद्राने त्याच्या आवडत्या अभिनेत्रीबाबत वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा- सलमानच्या चाहत्यांना मिळणार डबल सरप्राईज; ‘टायगर ३’ मध्ये शाहरुखबरोबर ‘हा’ अभिनेताही करणार कॅमिओ
शेअर चॅटला दिलेल्या मुलाखतीत राज कुंद्राने त्याला कोणत्या अभिनेत्रीबरोबर काम करायचं आहे याबाबतचा खुलासा केला आहे. मुलाखतीत राज कुंद्राला कोणत्या अभिनेत्रीबरोबर काम करायला आवडले असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राज म्हणाला “मला दीपिकाबरोबर काम करायला आवडेल. ती माझी आवडती अभिनेत्री आहे.”
राज कुंद्राच्या बायोपिक युटी ६९ बाबत बोलायचं झालं तर प्रदर्शनानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्याच दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने फक्त १० लाख रुपयांची कमाई केली आहे. मात्र, शनिवार व रविवारी वीकेंडला कमाईत वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच येत्या आठवड्यात चित्रपट चांगली कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा- Video दारु, डान्स, गाणी अन्…; शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या पार्टीतला इनसाईड व्हिडीओ व्हायरल
राज कुंद्राला २०२१ साली पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती. अश्लील ओटीटी अॅपच्या माध्यमातून पॉर्नोग्राफी सामग्री वितरित केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या प्रकऱणी २ महिने त्याला आर्थर रोड तुरुंगात रहावे लागले होते. ‘यूटी ६९’ मध्ये राज कुंद्राच्या आर्थर रोड जेलमधील दिवसांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात राज कुंद्रानेच मुख्य भुमिका साकारली आहे. दिग्दर्शक शाहनवाज अलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.