आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपट २८ वर्षांपूर्वी १५ नोव्हेंबर १९९६ रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याचे दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केले होते. त्यांनी या चित्रपटाच्या शूटिंगचे काही किस्से शेअर केले आहेत.
‘लेहरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत धर्मेश म्हणाले की ‘राजा हिंदुस्तानी’मध्ये आमिरबरोबर काम करण्यास होकार देण्याआधी काही गोष्टींमुळे ते चिंतेत होते. चित्रपटात आमिरला घेण्याआधी धर्मेश यांनी त्याला एक प्रश्न विचारला होता. “मी त्याला एक गोष्ट विचारली आणि त्याने त्याचं उत्तर दिल्याचं श्रेय मी त्याला देऊ शकतो. मी त्याला विचारलं, ‘आमिर, या चित्रपटात किती दिग्दर्शक असतील?’ त्याने माझ्याकडे पाहिलं. मी त्याला म्हणालो, ‘लोक काही गोष्टी बोलतात आणि मला त्यामुळे काळजी वाटते. लोक नेहमी खरं बोलतात असं नाही, पण प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव असतो’. यावर तो म्हणाला, ‘अर्थात धर्मेश, फक्त एकच दिग्दर्शक असेल’.
हेही वाचा- Video: एकाच मालिकेतील तिसऱ्या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई
आमिरने त्यांना म्हणाला की दिग्दर्शकाला काय वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. सिनेमाच्या क्रिएटिव्ह प्रक्रियेत भाग घेऊ शकतो का, असं आमिरने विचारलं होतं. त्यावर धर्मेश म्हणालेले, “पण तू हस्तक्षेप करणार नाहीस. मला घ्यायची असलेली ती हिरोईन मी घेईन, मला हवं ते ते गाणं मी घेईन, मी अर्चना पूरण सिंगला घेईन, मला जो किसिंग सीन शूट करायचा आहे ते मी शूट करेन.”
‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा दिग्दर्शक धर्मेश फक्त २८ वर्षांचे होते. “एवढा मोठा चित्रपट केला तेव्हा मी खूप लहान होतो आणि मी खूप मोठ्या कलाकारांबरोबर काम करत होतो,” असं ते म्हणाले.
हेही वाचा – लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
करिश्मा व आमिरचा किसिंग सीन
धर्मेश यांनी या मुलाखतीत आमिर आणि करिश्माच्या किसिंग सीनचा उल्लेख केला. या सीनचे शूटिंग सुरू असताना करिश्माची आई बबिता कपूर तिन्ही दिवस सेटवर होत्या. “करिश्मा सेटवर खूप चांगली वागायची. ती खूप उत्साहित होती. ती खूप प्रामाणिक होती… तिने याआधी कधीच किसिंग सीन केला नव्हता. मी तिला सांगितलं की ती या सीनसाठी कोणते कपडे परिधान करेल. तसेच सीनची पार्श्वभूमी सेक्सी नसेल असं मी तिला सांगितलं. ती म्हणाली, ‘तुम्ही मला इतकं सांगायची गरज नाही. मग मी बबिताजींना आत बोलावले आणि सीनबद्दल सांगितलं. कारण करिश्मा लहान होती. करिश्माची प्रतिमा खूप चांगली होती, ती गोंधळ घालणारी मुलगी नव्हती. या सीनचे शूटिंग सुरू असताना बबिता जी पूर्ण तीन दिवस सेटवर थांबल्या होत्या,” असं धर्मेश दर्शन म्हणाले.
आमिर व करिश्माचा किसिंग सीन चित्रपटाच्या पोस्टरवर असावा, अशी निर्मात्यांची इच्छा होती; मात्र त्यासाठी आपण तयार न झाल्याचं धर्मेश यांनी सांगितलं.