‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगणचा इंटेरोगेशन सीन आठवतोय का? एकीकडे तब्बू व तिचा सहकारी अजय देवगणकडून काही गोष्टी वदवून घेण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत असतात, त्याला व त्याच्या कुटुंबाला मारहाण करत असतात, तर दुसरीककडे तब्बूच्या पतीची भूमिका साकारणारा नट मात्र काकुळतीला येऊन जे काही खरं आहे ते सांगायची विनंती अजय देवगणला करताना पाहायला मिळतो. त्यावेळी खरंतर तब्बूपेक्षा किंवा अजय देवगणपेक्षा हा इतका नॅच्युरल नट नेमका कोण आहे? याबद्दल प्रत्येकाच्याच मनात कुतूहल निर्माण झालं असेल. पण तुम्हाला माहितीये का ती छोटीशी भूमिका साकारणारा कलाकार एक ताकदीचा अभिनेता व एक उत्कृष्ट लेखक व दिग्दर्शकही आहे.

आज आपण इंडस्ट्रीमधील अशा एका ‘कपूर’बद्दल जाणून घेणार आहोत जो कोणत्याही फिल्मी कुटुंबाचा हिस्सा नाही. आज आपण अशा एका ‘कपूर’बद्दल जाणून घेणार आहोत ज्याला अभिनेता म्हणून प्रेक्षकांनी आपल्या हृदयात स्थान दिलं आहे, परंतु एक दिग्दर्शक म्हणून त्याला जशी ओळख मिळायला हवी ती त्याला अद्याप मिळालेली नाही. तीनवेळा दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकूनही आज या दिग्दर्शकाच्या चित्रपटासाठी इंडस्ट्रीमधील कोणताही मोठा निर्माता पुढे येऊन तो चित्रपट सादर करायचं धाडसही करत नाही. तुम्हाला एव्हाना समजलंच असेल आज आपण रजत कपूर यांच्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल

आणखी वाचा : ‘हीरामंडी’ : एक ‘शाही मोहल्ला’ की वेश्या व्यवसायाचं केंद्रस्थान? भन्साळींच्या आगामी सीरिजमागचा इतिहास जाणून घ्या

दिल्लीत जन्मलेल्या आणि लहानचे मोठे झालेल्या रजत कपूर यांच्यावर चित्रपटांचे आणि खासकरून वर्ल्ड सिनेमाचे संस्कार त्यांच्या घरातूनच झाले. त्यांचे वडील चित्रपटप्रेमी असल्याने त्यांची जागतिक चित्रपटाशी ओळख लहानपणीच झाली अन् मग हळूहळू प्रादेशिक व मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्येही रजत यांची रुची वाढू लागली. यातूनच अभिनयाची आवड निर्माण झाली अन् १९८३ मध्ये त्यांनी दिल्लीमध्येच ‘चिंगारी’ नावाच्या ग्रुपमध्ये प्रवेश घेतला अन् रंगमंचाचा अनुभव त्यांना तिथेच मिळाला. नंतर १९८५ मध्ये त्यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्यूटमध्ये त्यांनी रीतसर अभिनय व दिग्दर्शनाच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला.

१९८९ मध्ये कुमार शहानी यांच्या ‘खयाल गाथा’ या चित्रपटातून रजत कपूर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. जेव्हा रजत इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा समांतर चित्रपटांची चळवळ ही तशी थंड पडली होती अन् ९० च्या दशकात खान मंडळींनी बॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत रजत कपूरसारख्या नटाचं या क्षेत्रात निभाव लागणं तसं कठीण दिसत होतं. अभिनयात फारशी संधी मिळत नसल्याने रजत यांनी आपला मोर्चा लेखन आणि दिग्दर्शनाकडे वळवला. ‘तराणा’ व ‘Hypnothesis’ या दोन शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून रजत यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं अन् या दोन्ही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यानंतर आमिर खानचा ‘दिल चाहता है’ आणि मीरा नायरच्या ‘मॉन्सून वेडिंग’ या दोन चित्रपटातून रजत कपूर यांना अभिनेता म्हणून ओळख मिळायला सुरुवात झाली. चरित्र भूमिका का असेना पण रजत यांना त्यांच्या या खास छोट्या पण प्रभावी भूमिकांसाठी ओळखलं जाऊ लागलं अन् नंतर त्यांनी याच भूमिकांना आपला हुकूमाचा एक्का बनवून आपलं स्वतःचं स्थान इंडस्ट्रीत निर्माण केलं. मधुर भांडारकर यांच्या ‘कॉर्पोरेट’मुळे रजत यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखीनच भर पडली.

एकीकडे अभिनय तर दुसरीकडे ‘रघु रोमियो’, ‘मिक्स्ड डबल्स’, ‘मिथ्या’सारख्या चित्रपटातून रजत कपूर यांनी दिग्दर्शक व लेखक म्हणून वेगवेगळे प्रयोग केले. रजत कपूर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट हे मुख्य प्रवाहातले नसून त्यावर जागतिक चित्रपटांचा अधिक प्रभाव होता अन् यामुळेच कदाचित त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवरील गणितात मागे पडले, पण एका सुजाण प्रेक्षकाला आणखी समृद्ध करण्याचं काम रजत यांनी त्यांच्या लिखाण व दिग्दर्शनातून केलं, किंबहुना ते आजही करत आहेत. आपल्या प्रेक्षकाला रजत यांनी कधीच गृहीत धरलं नाही त्यामुळेच व्यवसायात जरी त्यांचे चित्रपट मागे पडले असले तरी एक समृद्ध प्रेक्षक घडवण्यात रजत कपूर यांच्या चित्रपटांचा मोठा वाटा आहे. याबरोबरच चरित्र भूमिकांमधला तोचतोचपणा किंवा भडकपणा बाजूला ठेवून त्या भूमिका अधिक प्रभावी आणि मुख्य कलाकारांना झाकोळून टाकणाऱ्या कशा होतील हे रजत कपूर यांनी त्यांच्या संयत अभिनयातून दाखवून दिलं आहे. ‘भेजा फ्राय’, ‘जाने तू या जाने ना’, ‘एजेंट विनोद’, ‘कपूर अँड सन्स’, ‘दृश्यम’सारख्या चित्रपटातील अभिनयातून वेगळा मापदंडच रजत कपूर यांनी घालून दिला.

rajatkapoor1
फोटो : सोशल मीडिया

२०१४ मध्ये ‘आंखों देखी’ या चित्रपटातून रजत कपूर यांनी मांडलेली फिलॉसॉफी ही आजही प्रेक्षकांना पटलेली नाही, रुचलेली नाही किंबहुना ती लोकांना समजलेलीच नाही, इतका तो चित्रपट काळाच्या पुढचा आहे. या चित्रपटाने रजत कपूर यांचं नाव दिग्दर्शक म्हणून अधिक आदराने घेतलं जाऊ लागलं. नुकताच त्यांचा आलेला ‘RK/Rkay’ हा चित्रपटही त्याच पठडीतील होता. आरशातील आपलं प्रतिबिंब एकाएकी गायब झालं तर काय होईल या विचारावर बेतलेला हा चित्रपटही रजत यांनी वेगळ्याच ढंगात सादर केला. त्यांच्या या दोन्ही चित्रपटांना त्यांच्या प्रेक्षकांनी उचलून धरलं पण व्यावसायिक यश मात्र यांच्या नशिबात नव्हतं. अभिनेता म्हणून रजत कपूर यांना उशिरा का होईना पण ओळख अन् लोकप्रियता मिळाली. पण एक लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवण्यासाठी, आपला प्रेक्षकवर्ग तयार करण्यासाठी रजत यांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. इतक्या हुशार, कमालीची विचारशक्ती आणि कल्पकता असलेल्या लेखक आणि दिग्दर्शकाला या इंडस्ट्रीत अजूनही म्हणावी तशी लोकप्रियता न मिळणं हे दुर्दैवीच आहे. चित्रपटसृष्टीतील बड्याबड्या नावांच्या गर्दीत मागे राहिलेल्या पण प्रेक्षकांना आपल्या चित्रपटातून कायम एक वेगळा आनंद देणाऱ्या रजत कपूर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

Story img Loader