मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कपल राजीव सेन व चारू असोपा यांचा घटस्फोट झाला आहे. गेल्या काही दिवासांपासून राजीव व चारू त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत होते. आता कायदेशीररित्या घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, आज(८ जून) त्यांची अंतिम सुनावणी पार पडली. घटस्फोट झाल्यानंतर राजीवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. “आम्ही कायमचे वेगळे झालेलो नाही…दोन व्यक्ती ज्या एकमेकांना सांभाळू शकत नव्हत्या त्या वेगळ्या झाल्या आहेत. आमच्यात प्रेम असेल. आमच्या मुलीसाठी आम्ही आईबाबाची भूमिका पार पाडू,” असं त्याने इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

rajeev-sen-charu-asopa-divorced

हेही वाचा>> संत तुकारामांची पालखी सजवणाऱ्या ‘त्या’ मुस्लीम बांधवांसाठी किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, “कमरभैय्यांसह इम्रान शेख…”

चारु असोपा व सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन १६ जून २०१९ रोजी गोव्यात विवाहबंधनात अडकले होते. २०२१ साली चारू असोपाने गोंडस मुलीला जन्म दिला. राजीव सेन व चारू असोपाने लाडक्या लेकीचं नाव झियाना असं ठेवलं आहे.

हेही वाचा>> ‘आदिपुरुष’ चित्रपटाची १० हजार तिकिटे फ्री देणार! बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्मात्याचा मोठा निर्णय

राजीव सेन व चारू असोपामध्ये लग्नाच्या वर्षभरातच खटके उडण्यास सुरुवात झाली होती. मुलीच्या जन्मानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पुन्हा खटके उडू लागल्याने दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader