‘आखिरी खत’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या राजेश खन्ना यांनी एक-दोन नव्हे तर सलग तब्बल १७ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते. त्यांच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच खासगी आयुष्याबाबतही बरीच चर्चा रंगली होती. राजेश खन्ना हे त्यांच्या अभिनयाबरोबरच मनस्वी अन् फटकळ, बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. पण एकदा राजेश खन्ना सगळ्यांसमोर ढसढसा रडू लागले होते. त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यालाही शिव्या घातल्या होत्या. काय आहे तो किस्सा? घ्या जाणून…
राजेश खन्ना यांचा हा किस्सा अभिनेता मनोजकुमार यांच्या ‘उपकार’ चित्रपटाशी संबंधित आहे. हा चित्रपट १९६७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मनोज कुमार यांनी राजेश खन्ना यांना कास्ट केले होते, पण बाबू मोशाय यांनी हा चित्रपट सोडला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजेश खन्ना यांना स्वतः या चित्रपटात काम करायचे होते.
हेही वाचा- वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’ चित्रपटातील फर्स्ट लूक आऊट; दिसणार ‘या’ भूमिकेत
‘उपकार’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एके दिवशी राजेश खन्ना सेटवर पोहोचले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. खुद्द मनोजकुमार यांनी ही गोष्ट उघड केली होती. त्यांनी सांगितले होते की, ‘मी राजेश खन्ना यांना तेव्हापासून ओळखत होतो जेव्हा ते इंडस्ट्रीत नवीन होते आणि कामाच्या शोधात होते.’ त्यादरम्यान मनोजकुमार आणि राजेश खन्ना यांच्यात चांगली मैत्रीही झाली होती. दोघे ‘उपकार’ या चित्रपटात एकत्र काम करणार होते. पण बाबू मोशाय यांनी चित्रपट सोडला.
मनोज कुमार यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘एक काळ होता जेव्हा राजेश खन्ना यांना आठ-दहा निर्मात्यांनी साइन केले होते. त्या दरम्यान माझ्या असिस्टंटने मला राजेश खन्नाला भेटायला लावले. मी ‘उपकार’ बनवत होतो. मला तो या चित्रपटासाठी खूप आवडला होता आणि मला नवीन लोकांसोबत काम करायचे होते. तीन-चार महिन्यांपर्यंत तो माझ्या घरी यायचा, त्यामुळे आम्ही एक कुटुंबच झालो. त्यानंतर आम्ही दोघेही ‘उपकार’मध्ये काम करू लागलो.
हेही वाचा- मनोज बाजपेयी शूटिंगआधी खरंच वोडका शॉट्स घेतात? अभिनेत्याने सांगितला धमाल किस्सा
मनोज कुमार यांनी सांगितले की, “एके दिवशी आम्ही शूटिंगसाठी स्टुडिओमध्ये उपस्थित होतो. त्या वेळी ‘मेरे देश की धरती सोना उगले’ या गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू होते आणि माझ्याबरोबर राजेश खन्नाही उपस्थित होते. यानंतर तो पहाटे माझ्याजवळ येऊन बसला. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते आणि तो खूप रागावला होता. राजेश खन्ना यांना याचे कारण विचारले असता त्यांनी निर्मात्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राजेश खन्ना म्हणाले की, निर्माते मला सांगत आहेत की मी बाहेर काम करू शकत नाही. निर्मात्यांनी यामागे कराराचा हवाला दिला होता.