बॉलीवूडमध्ये १९७०-८० च्या दशकात राजेश खन्ना(Rajesh Khanna) हे लोकप्रिय अभिनेते होते. हा अभिनेता आजही विविध कारणांमुळे चर्चेत असलेला पाहायला मिळतो. अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी एका मुलाखतीत त्यांच्याविषयी एक आठवण सांगितली होती, त्यामुळे राजेश खन्ना यांची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे.

अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी १९७० च्या दशकात राजेश खन्ना यांच्याबरोबर लग्न केले होते. लग्नानंतर त्यांनी चित्रपटात काम करणे सोडून दिले. मात्र काही वर्षे एकत्र संसार केल्यानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. राजेश खन्ना यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा काम करण्यास सुरुवात केली.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…

Rajesh Khanna यांच्याबद्दल काय म्हणाल्या डिंपल कपाडिया?

‘रेडिफ’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत डिंपल कपाडिया यांनी राजेश खन्ना यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितले, “जय शिव शंकर या चित्रपटात आम्ही एकत्र काम करत होतो. चित्रपट चांगला आकारला जात होता. पण पैशांची अडचण होती. चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना एकदा त्यांची प्रकृती बिघडली होती. सीन असा होता की ते बाल्कनीत येतील आणि प्रेसला हात दाखवतील, त्यांच्याबरोबर संवाद साधतील. मी त्यांना माझी शाल दिली, सनग्लासेस दिले आणि चांगल्या पद्धतीने त्यांना सांगितले की, काकाजी तुम्ही त्यांच्याकडे सरळ बघू नका, तुमची साइड प्रोफाइल चांगली दिसते. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि कठोरपणे म्हणाले,”आता तू मला शिकवणार का?” मला खूप भीती वाटली, मी हात जोडले आणि त्यांची माफी मागितली.” असा किस्सा त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितला होता.

हेही वाचा: “योगिता चव्हाण बिग बॉस आणि महाराष्ट्राला मूर्ख…”, पहिल्या पर्वातील मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत

राजेश खन्ना यांच्या उतरत्या काळाबद्दल डिंपल कपाडिया यांनी अनेकदा वक्तव्य केले आहे. कारण तो काळ त्यांनी फार जवळून पाहिल्याचे त्या म्हणतात. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते, “अपयशाबरोबर तो माझा पहिलाच सामना होता. जेव्हा एक यशस्वी माणूस तुकड्यांमध्ये विखुरला जातो, त्यावेळी त्याच्या आजूबाजूचा सगळा परिसरदेखील निराशेने व्यापला जातो. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा राजेश आठवड्याच्या शेवटी कलेक्शनच्या आकड्यांची वाट बघायचा पण लोक त्याला सांगण्याची हिम्मत करत नव्हते, हे खूप दयनीय दृश्य असायचे.” अशी आठवणदेखील त्यांनी सांगितली होती.

राजेश खन्ना हे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांचे चित्रपट पाहणे म्हणजे उत्सव मानले जायचे. मात्र त्यांच्या कारकिर्दीच्या उतरत्या कळात त्यांचे इतर कलाकारांबरोबरचे वागणे चांगले नसल्याचे म्हटले जाते.

दरम्यान, राजेश खन्ना यांचे अभिनय क्षेत्रातील योगदान महत्वाचे मानले जाते.

Story img Loader