Janhvi kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या ‘उलझ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून या चित्रपटाची सोशल मीडियावर खूपच चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटातील जान्हवी (Janhvi kapoor)चे सहकलाकार व प्रसिद्ध अभिनेते राजेश तैलंग यांनी तिच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेते राजेश तैलंग हे ‘उलझ’ चित्रपटात भूमिका करताना दिसणार आहेत. जान्हवी कपूर सोबत काम केल्यानंतर तिच्यामध्ये श्रीदेवीची झलक दिसत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. जान्हवीचे कौतुक करताना त्यांनी म्हटलेय, “जान्हवी सहज अभिनय करणारी आणि जमिनीवर पाय असणारी अभिनेत्री आहे. आम्ही सगळे तिच्या आईचे चाहते होतो. तिच्यात तुम्हाला श्रीदेवीची झलक पाहायला मिळेल.” पुढे ते म्हणतात, “उलझ चित्रपटामधील माझे सर्वच सहकारी प्रामाणिक आणि परिश्रम घेणारे आहेत. त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांच्या वयाचा असताना मी इतके चांगले काम करू शकत होतो, त्यांच्यासारखा उत्तम अभिनय करत होतो, असे मला वाटत नाही.”

हेही वाचा: अभिषेक बच्चनच्या ‘त्या’ कृतीने ऐश्वर्या रायबरोबरच्या घटस्फोटांच्या चर्चांना पुन्हा उधाण

Janhvi kapoorचे चित्रपट

सुधांशु सारिया दिग्दर्शित ‘उलझ’ चित्रपटाची सध्या खूपच चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांना तो आवडला असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, जान्हवी कपूरने २०१८ मध्ये ‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात जान्हवीबरोबर इशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यानंतर जान्हवीने २०२० मध्ये ‘गुंजन सक्सेना’, २०२१ मध्ये ‘रुही’, २०२२ मध्ये ‘गुड लक जेरी’, २०२३ मध्ये ‘बवाल’ या चित्रपटांत अभिनय करीत आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. २०२४ मध्ये ‘मिस्टर आणि मिसेस माही’ व ‘उलझ’ या चित्रपटांत ती दिसणार आहे. दरम्यान, राजेश तैलंग यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे. अभिनेता असण्याबरोबरच ते एक लेखकदेखील आहेत.

दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी एक लोकप्रिय अभिनेत्री होती. तिचा चाहतावर्गही मोठा होता. मात्र, २४ फेब्रुवारी २०१८ ला अभिनेत्रीचे अचानक निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात होती. तिच्या निधनाने बॉलीवूडने एक उत्तम अभिनेत्री गमावल्याचे म्हटले जात होते. जान्हवी ही श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी असून, सध्या ती बॉलीवूडमध्ये आपला जम बसवताना दिसत आहेत. खुशी कपूर ही त्यांची धाकटी लेक आहे.आता जान्हवीचा ‘उलझ’ चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालत बॉक्स ऑफिसवर कमाल करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajesh tailang said can see glimpse of sridevi in janhvi kapoor co actor ulajh upcoming movie nsp