Mr and Mrs Mahi Box Office Collection Day 2: शरण शर्मा दिग्दर्शित ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर चर्चा सुरू आहे. ३१ मेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. दोघांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा व समीक्षकांचा समिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील असंच काहीस चित्र पाहायला मिळत आहे. ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटाने पहिल्या दिवशी दमदार कमाई केली पण दुसऱ्या दिवशी वेग मंदावला.

३१ मेला ‘सिनेमा लवर्स डे’ साजरा करण्यात आला होता. ९९ रुपये तिकटात कोणताही चित्रपट पाहण्याची ऑफर होती. याचाच फायदा राजकुमार राव व जान्हवीच्या ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटाला झाला. बॉक्स ऑफिसवरील या चित्रपटाची सुरुवात दमदार झाली. पहिल्याच दिवशी ६.८५ कोटींचा व्यवसाय या चित्रपटाने केला. पण दुसऱ्या दिवशी शनिवार कमाईत मोठी घट पाहायला मिळाली. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटाने शनिवारी ४.५० कोटींची कमाई केली. ही कमाई पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा खूप कमी आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत एकूण ११.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे. पण राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’च्या तुलनेत ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी अधिक कमाई केली आहे.

Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Stree 2 Actor Mushtaq Khan Kidnapping
१२ तास डांबून ठेवलं अन्…; ‘स्त्री २’ फेम बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण! कशी झाली सुटका? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित

हेही वाचा – “प्रत्येक जन्मी तुझ्याच पोटी जन्म मिळू दे…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची आईसाठी खास पोस्ट, म्हणाला…

राजकुमार रावच्या ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटाने पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी कमी कमाई केली असली तरी ‘श्रीकांत’ चित्रपटापेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. १० मेला प्रदर्शित झालेल्या ‘श्रीकांत’ चित्रपटाने प्रदर्शनानंतरच्या पहिल्या शनिवारी ४.२ कोटींचा गल्ला जमवला होता. तर ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपट ४.५० कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा – Video: घोडबंदरच्या वाहतूक कोंडीत अडकल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री; कसं करतायत स्वतःचं मनोरंजन? पाहा व्हिडीओ

दरम्यान, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्स आणि जी स्टूडियोजची निर्मिती ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपट आहे. शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात प्रेमकहाणी पाहायला मिळते. राजकुमार राव व जान्हवी कपूर क्रिकेट प्रेमी दाखवण्यात आले असून दोघांनी पती-पत्नीची भूमिका निभावली आहे. राजकुमार राव व जान्हवी कपूर दुसऱ्यांदा एकत्र झळकले आहेत. यापूर्वी ‘रूही’ चित्रपटात दोघं पाहायला मिळाले होते. राजकुमार राव व जान्हवीचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता, पण दोघांची केमिस्ट्री हिट झाली होती.

Story img Loader