बॉलिवूडमध्ये आता स्टार किड्सना मागे टाकून अनेक कलाकारांनी आपली छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. राजकुमार राव बॉलिवूडमधला सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याने सिनेसृष्टीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचे अनेक चित्रपट गाजले आहेत. त्यापैकी ‘स्त्री’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.

गेले अनेक दिवस ‘स्त्री २’ची चर्चा होत आहे. अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरदेखील यासाठी तयारी करत आहेत असे बोलले जात आहे. ‘स्त्री २’मध्ये ही सगळी पात्रं पुन्हा दिसणार असल्याचा इशाराही काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिला होता. आता राजकुमार राव याने ‘स्त्री’ चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
govinda wife sunita reveals actor hit two girls in college
“एका मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकलं, तर दुसरीला…”, १८ व्या वर्षी सुनीताने केलेलं गोविंदाशी लग्न, ‘त्या’ प्रसंगानंतर झालेली पहिली भेट

हेही वाचा : KBC 14: चित्रपट विनामूल्य पाहता यावा यासाठी अमिताभ बच्चन करायचे ‘हे’ काम; बिग बींनी सांगितलं गुपित

‘अमर उजाला’ या वृत्तवाहिनीला राजकुमारने नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी त्याला ‘स्त्री २’बद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने या चित्रपटाबद्दल अधिक माहिती दिली. तो म्हणाला, “स्त्री या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मला आत्तापर्यंत कोणीही विचारणा केलेली नाही. स्त्री हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रचंड गाजला. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग नक्कीच यायला हवा. पण इतक्यात मी ‘स्त्री २’बद्दल खात्रीनिशी काहीही सांगू शकत नाही किंवा मी कुठली घोषणाही करणार नाही. याचं कारण म्हणजे ‘स्त्री २’बद्दल माझी कोणाशीही बोलणी झालेली नाहीत.”

आणखी वाचा : “…तेव्हापासून मी प्रमुख भूमिकेसाठी ऑडिशन देणे बंद केले,” राजकुमार रावने सांगितला धक्कादायक अनुभव

‘स्त्री’ हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन, विजय राझ, नोरा फतेही, अभिषेक बॅनर्जी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाची कथा, गाणी प्रेक्षकांना खूप आवडली. तेव्हापासूनच या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader