बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. ‘गदर २’मधून सनी देओलने बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक केला. प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतला. गोव्यात सुरू असलेल्या ५४ व्या चित्रपट महोत्सवात नुकतीच सनी देओलने हजेरी लावली. यावेळी त्याने इंडस्ट्रीमधील स्वतःच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं. याविषयी बोलताना सनी फार भावुकही झाला. ‘गदर’सारखा सुपरहीट चित्रपट देऊनसुद्धा त्याला चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स येत नव्हत्या याचाही त्याने खुलासा केला.

याच महोत्सवात निर्माते दिग्दर्शक राहुल रवैलदेखील उपस्थित होते. राहुल यांच्याबरोबर सनीने काही अजरामर चित्रपट दिले. याबद्दल बोलताना सनी म्हणाला, “मी स्वतःला फार नशीबवान समजतो की राहुलबरोबर मी माझा प्रवास सुरू केला. त्याने मला ३ सर्वोत्तम चित्रपटात काम दिलं, त्यापैकी काही चालले तर काही फ्लॉप ठरले परंतु आजही प्रेक्षक त्या चित्रपटांची आठवण काढतात. आज मी इथे तुमच्यासमोर उभा आहे तो केवळ माझ्या चित्रपटांमुळे.”

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

आणखी वाचा : तब्बल ३८ भाषा अन् 3D व आयमॅक्समध्ये प्रदर्शित होणार ‘या’ सुपरस्टारचा चित्रपट; प्रदर्शनाआधीच कमावले ‘इतके’ कोटी

पुढे सनी म्हणाला, “गदरसारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतरच माझा खरा स्ट्रगल सुरू झाला कारण मला चांगल्या चित्रपटांची ऑफरच येत नव्हती पण मी हार मानली नाही. मी चित्रपटविश्वात उतरलो कारण मला एक अभिनेता व्हायचं होतं, स्टार नाही. मी माझ्या वडिलांचे चित्रपट पहिले आहेत मला तसे वैविध्यपूर्ण चित्रपट करायचे आहेत.”

याच कार्यक्रमात प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक राजकुमार संतोषीदेखील उपस्थित होते. राजकुमार संतोषी यांनीदेखील सनीबरोबर ‘दामिनी’, ‘घातक’, ‘घायल’सारखे दर्जेदार व सुपरहीट चित्रपट दिले आहेत. त्यांनीदेखील सनीबद्दल भाष्य केलं. राजकुमार संतोषी म्हणाले, “मला असं वाटतं की या चित्रपटसृष्टीने सनी देओलच्या गुणांची कदर केली नाही, म्हणावी तशी दखल घेतली नाही. परंतु देवाने मात्र त्याच्या या कलेला योग्य न्याय दिला.”

राजकुमार संतोषी यांच्याबरोबर सुपरहीट चित्रपट देणाऱ्या सनी देओलबरोबर नंतर त्यांचे संबंध काही कारणांमुळे बिघडले. पण आता मात्र त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली आहे. लवकरच राजकुमार संतोषी हे सनी देओलसह एक नवा चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटात सनीसह आमिर खानही मुख्य भूमिकेत असणार अशी चर्चा आहे.

Story img Loader