बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव हे त्यांचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’च्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला असून, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच जान्हवीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओचं कनेक्शन थेट ‘हीरामंडी’शी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हीरामंडी- द डायमंड बाजार’मधला अदिती राव हैदरीने केलेला ‘गजगामिनी वॉक’ सध्या ट्रेंडिग आहे. अनेक इन्फ्लुएन्सर्स, कलाकार हा वॉक करून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतायत. अशातच जान्हवीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून गजगामिनी वॉकचा व्हिडीओ शेअर केलाय. आता गजगामिनी वॉक जान्हवी सुंदरच करील यात शंका नाही; परंतु हा वॉक जान्हवीनं केला नसून, चक्क राजकुमार रावनं केला आहे. जान्हवीनं राजकुमार रावचा हा व्हिडीओ शेअर करताच तो तुफान व्हायरल झाला.

हेही वाचा… VIDEO: “भावाचं ब्रेकअप झालं…”, पृथ्वीक प्रतापचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले…

जान्हवीच्या या व्हायरल व्हिडीओत राजकुमार आणि जान्हवी क्रिकेटचा सराव करताना दिसतायत. राजकुमारनं स्पोर्ट्स जॅकेट आणि ट्रॅक्स घातलीय. तर, या व्हिडीओत जान्हवीनं क्रिकेटचे पॅड्स, ग्लोव्हज आणि हेल्मेट घातलं आहे. राजकुमारनंही क्रिकेट पॅड्स घातल्याचं या व्हिडीओवरून कळतंय. त्यात राजकुमार गजगामिनी वॉक करताना दिसतोय. जान्हवीनं हा व्हिडीओ शेअर करीत त्याला कॅप्शन देत लिहिलं, “आमचा स्वत:चा असा गजगामिनी वॉक. त्या सर्व क्रिकेट पॅड्सची सवय व्हायला आम्हाला वेळ लागला; पण मला आनंद झाला की, मी मिस्टर माहीची मजा घेऊ शकले.”

जान्हवीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. नेटफ्लिक्स इंडियाच्या अकाउंटवरून “आजकल हर राजकुमार बिब्बोजान का फॅन है”, अशी कमेंट आली आहे.

हेही वाचा… “मी श्रीमंत बनू शकत नाही”, मनोज बाजपेयींचं वक्तव्य चर्चेत, अंबानींचा उल्लेख करत म्हणाले…

तर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “हा फराह खानसारखा दिसतो.” एकानं कमेंट केली, “हा मलायकासारखा का चालतोय?” तर, एकानं विचारलं, “पुन्हा सर्जरी केली का? “

दरम्यान, ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ३१ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी कपूरबरोबर या चित्रपटात राजकुमार राव प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तसेच जरीना वहाब, कुमुद मिश्रा, अभिषेक बॅनर्जी या कलाकारांच्याही निर्णायक भूमिका यात आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajkummar rao gajagamini walk of heeramandi went viral netizens trolled him dvr