बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव याने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकुमारने नोव्हेंबर २०२१ मध्ये अभिनेत्री पत्रलेखाशी लग्नगाठ बांधली. या दोघांचे चाहते अनेकदा त्यांना बाळाचे प्लॅनिंग केव्हा करणार किंवा तुम्ही आई-बाबा केव्हा होणार, असे प्रश्न विचारत असतात. याबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता राजकुमार रावने खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : जावई अन् लेकीसाठी परिणीतीच्या आईची भावुक पोस्ट; म्हणाली, “तुमच्या आयुष्यात…”

राजकुमार रावने नुकतीच ‘बिग बॉस’ फेम शहनाझ गिलच्या ‘देसी वाईब्स विथ शहनाझ’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या वेळी अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. शहनाझने राजकुमारला बाळाचे प्लॅनिंग केव्हा करणार याबाबत प्रश्न केला. शहनाझचा प्रश्न ऐकून अभिनेता काहीसा लाजला आणि म्हणाला, “मला हा प्रश्न माझ्या घरचेसुद्धा कधीच विचारत नाहीत. आम्ही याबाबत काहीही विचार केलेला नाही. कारण अजूनपर्यंत मी स्वत: एक लहान मुलगा आहे.”

हेही वाचा : “हा शेवटचा चित्रपट…” ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचे वक्तव्य, म्हणाली “पुन्हा संधी मिळेल की नाही…”

राजकुमार पुढे शहनाझकडे बघत म्हणाला, जर मला मुलगी झाली, तर ती तुझ्यासारखी (शहनाझ) बिनधास्त, गोड आणि साधी असावी अशी माझी इच्छा आहे. अभिनेत्याची ही इच्छा ऐकून शहनाझ गिल आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले.

राजकुमार लवकरच अभिनेत्री जान्हवी कपूरसह ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. याव्यतिरिक्त राजकुमारचा ‘स्त्री २’ चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच शहनाझने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajkummar rao talks about baby planning in shehnaaz gill desi vibes special episode sva 00