Ayodhya Ram Mandir Opening Ceremony: आज संपूर्ण देशभरात राममय वातावरण पाहायला मिळत आहे. अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन होऊन प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या ऐतिहासिक क्षणाची संपूर्ण देशातील लोक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण आला आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मंडळी अयोध्येत पोहोचले आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटींसह दाक्षिणात्य सुपरस्टार रामनगरीत पोहोचले आहेत. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. अशातच प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादवच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बॉलीवूड नाउ’ या एंटरटेनमेंट इन्स्टाग्राम पेजवर अभिनेता राजपाल यादवाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, राजपाल यादव भररस्त्यात उत्साहाने डान्स करताना दिसत आहे. झेंडा नाचवत, जय श्रीरामाचा जयघोष करत अभिनेता डान्स करताना पाहायला मिळत आहे. राजपाल यादवचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: राम चरण अयोध्येला रवाना, रामनगरीत जाण्यापूर्वी घराबाहेर चाहत्यांनी एकच गर्दी, भेटवस्तू म्हणून दिले रामाचे फोटो

अभिनेता राजपाल यादवच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “जय श्रीराम”, “क्या बात है सरजी”, “आनंदी व्यक्ती”, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, अयोध्येत अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रोहित शेट्टी, आयुष्मान खुराना, राजकुमार हिरानी, विक्की कौशल, कतरिना कैफ, कंगना रणौत, मधुर भांडारकर असे अनेक सेलिब्रिटी पोहोचले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajpal yadav dance for ayodhya ram mandir opening ceremony video goes viral pps