बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवने आपल्या दमदार विनोदी शैलीने लोकांची मने जिंकली आहेत. राजपालने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारली आहे. पण पडद्यावर सर्वांना हसवणाऱ्या राजपालने खऱ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान राजपालने त्याच्या आयुष्यातील भयानक घडामोडींचा खुलासा केला. या मुलाखतीत राजपालने त्याच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूबाबत सांगितलं आहे.

हेही वाचा- निर्मात्यांनी ‘आदिपुरुष’चे 3D तिकिट दर केले कमी; ऑफर पाहून नेटकरी म्हणाले, “ही भीक मागायची…”

अलीकडेच राजपालने ‘द ललनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या व्यक्तीक आयुष्यातील घटनांचा उलघडा केला आहे. राजपाल म्हणाला “माझ्या वडिलांनी वयाच्या २० व्या वर्षी माझे लग्न केले. लग्नानंतर माझ्या पहिल्या पत्नीने मुलीला जन्म दिला. याच दरम्यान तिचे निधन झाले. मला दुसऱ्या दिवशी तिला भेटायचे होते पण नंतर मी तिचे प्रेत खांद्यावर घेऊन जात होतो. मी माझ्या कुटुंबाचे, माझ्या आईचे, माझ्या वहिनीचे आभार मानतो, माझ्या मुलीला तिची आई नाही, असे कधीच वाटले नाही. तिला त्यांनी खूप प्रेमाने मोठ्ठ केलं.”

हेही वाचा- १०व्या दिवशी ‘आदिपुरुष’च्या कमाईत थोडी वाढ, चित्रपटाचे एकूण कलेक्शन ‘इतके’ कोटी

राजपाल पुढे म्हणाला की १९९१ मध्ये त्याच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने स्वत: ची अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. यासाठी मला १३ वर्षे लागली. या दरम्यान मी एनएसडीमध्ये शिक्षण घेतले, टीव्ही आणि चित्रपट केले.” २००० मध्ये राजपालचा जंगली चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातूनच त्याला खरं यश मिळाले.

दुसऱ्या पत्नीबाबात बोलताना राजपाल म्हणाला, “मी ३१ वर्षांचा होतो जेव्हा मी राधाला भेटलो. मी २००१ मध्ये ‘द हीरो’च्या शूटिंगसाठी कॅनडाला गेलो होतो जिथे आम्ही पहिल्यांदा आम्ही भेटलो. एकमेकांना डेट केल्यानंतर आम्ही २००३ मध्ये दोन्ही घरच्यांच्या संमतीने लग्न केले.

हेही वाचा- “मी निर्मात्यांना पैसे परत केले कारण…”, २०१६ नंतर घेतलेल्या ब्रेकबद्दल अभिषेक बच्चन प्रथमच बोलला

राजपाल यादवच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर राजपाल यादवने १९९९ मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्याने ‘कंपनी’, ‘हम किसी से कम नहीं’, ‘हंगामा’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘मैं मेरी पत्नी और वो’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘फिर हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’ चुप चुपके’ आणि ‘भूल भुलैया’ सारख्या सुपरहिट चित्रपटात दिसला.