बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच होऊन गेला. शाहरुख गौरी बॉलिवूडमधील एक आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जात. शाहरुखने अनेकदा त्याची लव्हस्टोरी सांगितली आहे. आज दोघे ते मन्नतसारख्या आलिशान बंगल्यात राहत असले तरी सुरवातीच्या काळात त्यांच्याकडे पैशांची कमतरता होती. लग्नानंतर त्यांच्या हनिमूनचा खर्चदेखील दुसऱ्याने केला आहे.

शाहरुखने आपल्या करियरची सुरवात मालिकांपासून केली. त्यानंतर दिवाना चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरवातीच्या काळात त्याचा ‘राजू बन गया जेंटलमन’ हा चित्रपट आजही अनेकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटा चित्रीकरणादरम्यान शाहरुख खानने गौरीशी लग्न केले.

Photos : लग्नाआधी शारीरिक जवळीक असतेच, मात्र… नेहा पेंडसेने केलेले बोल्ड वक्तव्य चर्चेत

चित्रपटाचे लेखक आणि असोसिएट दिग्दर्शक मनोज ललवानी यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत चित्रीकरणादरम्यानचे किस्से सांगितले. ते असं म्हणाले, “या चित्रपटाचे चित्रीकरण दार्जिलिंगमध्ये करण्यात आले होते. शाहरुख खानने तेव्हा दिल्लीत होता. त्याने लग्न केले आणि तो गौरीला घेऊन दार्जिलिंगला हनिमूनसाठी घेऊन आला. आमच्या चित्रपटाची टीम ट्रेनने दार्जिलिंगला पोहचली आणि शाहरुख गौरी विमानाने पोहचले. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या हनिमूनचा सगळा खर्च उचलला होता. विमान प्रवासापासून ते दार्जिलिंगमधील हॉटेलमधील वास्तव्यापर्यंत.”

१९९२ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात शाहरूख खान, जुही चावला, नाना पाटेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. अझीझ मिर्झा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.