Dono box office collection day 1: सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर व पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा यांनी एकाच चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यांचा पहिला चित्रपट ‘दोनों’ शुक्रवारी (६ ऑक्टोबर रोजी) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश बडजात्याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कोणाच्या बापाची हिंमत नाही की…”, अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला, “सगळे मला…”

‘दोनों’ हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचं आमिर खान, सलमान खान आणि अनुपम खेर यांनी प्रमोशन केलं होतं. पण त्याचा फारसा फायदा चित्रपटाला झाला नाही, असं दिसत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी अवघ्या ३५ लाख रुपयांची कमाई केली, जी खूपच कमी आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी ‘मिशन रानीगंज’ आणि भूमी पेडणेकरच्या ‘थँक यू फॉर कमिंग’बरोबर स्पर्धा करावी लागली. तिन्हींपैकी दोनोंचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सर्वात कमी राहिलं.

अक्षय कुमारच्या ‘मिशन रानीगंज’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? ५५ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावले…

सनीचा मोठा मुलगा करण देओलने २०१९ मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. स्वत: सनीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.३ कोटी रुपयांची कमाई केली होती आणि अखेरीस तो फ्लॉप झाला होता. त्या चित्रपटाच्या तुलनेत राजवीरचा चित्रपट खूपच कमी कमाई करू शकला आहे. मुलाच्या चित्रपटाला काही लाखात ओपनिंग मिळाली असताना सनीने मात्र यंदा ‘गदर २’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला.

‘दोनों’ हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ज्याला एका लग्नाची पार्श्वभूमी आहे. राजवीर आणि पलोमा यांनी देव आणि मेघना नावाची पात्रं साकारली आहे. ते दोघे एका लग्नात भेटतात आणि प्रेमात पडतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाला फारसं यश आलेलं नाही पण शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या वीकेंडमध्ये चित्रपट किती कमाई करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajveer deol paloma starrer dono box office collection day 1 film earned 30 lakh hrc