Krrish 4 Update : राकेश रोशन हे बॉलीवूडमधील एक दिग्गज निर्माते-दिग्दर्शक आहेत. ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रिश’सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीमुळे ते लोकप्रिय आहेत. सध्या त्यांनी दिग्दर्शित केलेला आणि शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘करण अर्जुन’ जवळपास तीन दशकांनंतर पुन्हा सिनेमागृहात आज (२२ नोव्हेंबर २०२४) प्रदर्शित झाला आहे. याचदरम्यान त्यांनी एका मुलाखतीत आगामी चित्रपट आणि त्यांच्या करिअरबद्दल खुलासे केले.
ई-टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या दिग्दर्शनाच्या प्रवासाबद्दल आणि विचारप्रक्रियेबद्दल सविस्तर चर्चा केली. या दरम्यान त्यांनी केलेल्या एका मोठ्या घोषणेमुळे चाहत्यांना धक्का दिला. राकेश रोशन यांनी जाहीर केले की, आता ते कोणताही चित्रपट दिग्दर्शित करणार नाहीत. याचा अर्थ ते ‘क्रिश ४’चे दिग्दर्शन करणार नाही असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा…Video : डॉक्युमेंटरीच्या मोठ्या वादानंतर धनुष आणि नयनतारा यांची एकाच सोहळ्याला उपस्थिती, पण…
‘क्रिश ४’ची धुरा नव्या दिग्दर्शकाकडे, पण…
आजवर ज्या प्रकारे राकेश रोशन यांनी हृतिक रोशनला ‘क्रिश’ या फ्रँचायजीत सादर केले, तसे कोणीच करू शकणार नाही; त्यामुळे चाहत्यांची अशी अपेक्षा होती की, राकेशच हा चित्रपट दिग्दर्शित करतील. मात्र, यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हो, मी ‘क्रिश ४’ दिग्दर्शित करणार नाही. पण, मी या चित्रपटाच्या पटकथेसाठी पूर्ण वेळ उपस्थित असेन. हा चित्रपट तसाच बनवला जाईल, जसा मी बनवला असता; त्यामुळे चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही.”
पित्याचा सल्ला, मुलाची साथ
राकेश रोशन यांनी हृतिकबरोबरच्या त्यांच्या अभिनेता-दिग्दर्शक या नात्याविषयी सांगितले. ते म्हणाले, “इतर अनेक दिग्दर्शकांनीही हृतिकला अप्रतिमरीत्या सादर केले आहे. मला त्याचा ‘गुजारिश’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘फायटर’ आणि ‘वॉर’मधील अभिनय खूप आवडतो.” त्यांनी पुढे सांगितले, “पण हृतिक माझा मुलगा असल्यामुळे मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. तो जर काही चूक करत असेल, तर मी त्याला सरळ सांगू शकतो, ‘डुग्गु (हृतिक), हे बरोबर नाही.’ तसंच तोही मला प्रामाणिकपणे सांगू शकतो, ‘पापा, जर तुम्ही कॅमेरा असा ठेवला, तर मी जास्त चांगला अभिनय करू शकेन.’ हे तो मला सांगू शकतो, पण इतर कोणत्याही दिग्दर्शकाला सांगू शकणार नाही.”
हेही वाचा…‘या’ कारणामुळे शाहरुख खान सोडणार होता बॉलीवूड; दिल्लीला जाण्याची तयारी करत पकडलं होतं विमान, पण…
“कुटुंब एकत्र आल्यास सर्जनशीलता वाढते”
राकेश रोशन यांनी याच मुलाखतीत सांगितले की, “सर्जनशील (क्रिएटिव्ह) कुटुंब जेव्हा एका चित्रपटासाठी एकत्र येते, तेव्हा त्या निर्मितीत वेगळेपणा येतो. चित्रपटात पाच आधारस्तंभ असतात – निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि संगीत. यापैकी चार स्तंभ आपल्याकडेच आहेत.”