लोकप्रिय असण्याचे अनेक फायदे असतात आणि तोटेही असतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राकेश रोशन(Rakesh Roshan) एक किस्सा सांगितला आहे. प्रसिद्धीमुळे अनेकदा त्यांच्यावर सहज निशाणा साधला जातो. आता लोकप्रिय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राकेश रोशन यांनी एका मुलाखतीत त्यांच्याबरोबर घडलेली एक घटना सांगितली आहे.
राकेश रोशन काय म्हणाले?
राकेश रोशन यांनी नुकतीच फीव्हर एफएमला मुलाखत दिली. या मुलाखतीत, राकेश रोशन यांनी किस्सा सांगत म्हटले, “मी आणि जितेंद्र एकदा एका रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. एक दारू प्यायलेला माणूस आमच्यासमोर बसला होता. त्याने आम्हाला शिवीगाळ करायला सुरूवात केली.माझं व जितेंद्रचे त्याने नाव घ्यायला सुरूवात केली. हे सगळं बघून मला राग आला होता. मी जितेंद्रला म्हटलं की जीतू आपल्याला त्याच्याशी बोलायला हवं. जीतू मला म्हणाला की आपण इथून जाऊया. शांत राहा. आम्ही त्याला ओळखत नव्हतो. तो आम्हाला ओळखत होता. त्यामुळे आम्ही त्याचा सहज निशाणा बनलो. आम्ही तिथून निघून गेलो.”
राकेश रोशन यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्याबद्दल वक्तव्य केले होते.‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट १४ जानेवारीला रिलीज झाला आणि एक आठवड्यानंतर राकेश रोशन त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडत असताना, त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दोन गोळ्या लागल्यानंतर राकेश रोशन यांनी स्वत:च दवाखान्यात धाव घेतली होती. राकेश रोशन यांच्यावर ज्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्या गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचा संबंध अंडरवर्ल्डशी होता. राकेश रोशन यांनी ‘बॉलीवूड हंगामा’ला मुलाखत दिलीया मुलाखतीत त्यांच्यावर जो हल्ल्याबद्दल म्हटले होते की अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांना त्यांच्या पैशातून निर्माण केलेल्या हृतिकने चित्रपटात काम करावे असे गुन्हेगारांना वाटत होते. मात्र, तसे घडले नाही, तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
दरम्यान, राकेश रोशन नुकतेच ‘द रोशनज’ या डॉक्युमेंटरीमध्ये दिसले होते. ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये राकेश रोशन यांनी प्रामाणिकपणे म्हटले आहे की त्यांच्या अभिनयाच्या करिअरमधून त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते. त्यामुळे ते चित्रपट निर्मितीकडे वळले. त्यांनी २०१३ मध्ये क्रिश ३ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.