बॉलीवूडमधील यशस्वी व लोकप्रिय अभिनेते, अशी सलमान खान(Salman Khan) व शाहरुख खान(Shah Rukh Khan) यांची ओळख आहे. महत्त्वाचे म्हणजे या दोन अभिनेत्यांना एका चित्रपटात एकत्र काम करताना पाहणे, ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. ‘हम तुम्हारे है सनम’, ‘दुश्मन दुनिया का’, ‘टायगर ३’ अशा अनेक चित्रपटांत काम करीत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, ‘करण अर्जुन’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली होती. या चित्रपटाची लोकप्रियता आजही तितकीच असल्याचे पाहायला मिळते. ते त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गमतीजमतीही करायचे. विनोदी पद्धतीने सेटवरील लोकांना फसवायचे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान आणि शाहरुख यांनी केलेल्या एका कृतीमुळे सेटवरील सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता, याची आठवण सांगितली आहे.

‘करण अर्जुन’च्या सेटवर नेमकं काय घडलेलं?

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांनी नुकतीच ‘गल्लाटा इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ‘करण अर्जुन’ चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगताना म्हटले, “दिवसभर शूटिंग केल्यानंतर आम्ही सगळे, संपूर्ण युनिट एकत्र मजा करायचो. संपूर्ण युनिट एकत्र बसले होते. सलमान आला, त्याने सहजपणे गोळी झाडली आणि शाहरुख खाली पडला. हे दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. मी म्हटलं की, हे काय केलंस? हे काय झालं? ते दोघं आधी एकमेकांशी भांडले आणि त्यानंतर त्यांनी हे सगळं नाटक केलं. थोड्या वेळानं शाहरुख जमिनीवरून उठला. मला आठवतं की, मी त्यांना म्हटलेलं की, असं करत जाऊ नका. हा कसला विनोद आहे? हे खूप गंभीर आहे. त्यामुळे कोणाला तरी धक्का बसून, त्याचा मृत्यू होऊ शकतो. मात्र त्यावेळी ते लहान होते”, असे राकेश रोशन यांनी म्हणत शाहरुख व सलमान कशा प्रकारे खोड्या काढायचे, प्रँक करायचे याबद्दल सांगितले आहे.

Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
kisan kathore ganesh naik marathi news
Kisan Kathore : “ते बदलापूरचे नाही बेलापुरचे महापौर होतील”, आमदार कथोरे यांची वामन म्हात्रे यांच्यावर मार्मिक टीपणी
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण

‘आप की अदालत’ या शोमध्ये सलमान खानने एकदा हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानेसुद्धा हा किस्सा सांगितले होता. सलमानने म्हटले होते, “मी सेटवरून गोळ्या नसलेली बंदूक आणली. मला सगळ्यांबरोबर प्रँक करायचा होता. मी शाहरुखला सांगितले की, मी तुला डान्स करण्यासाठी बोलवेन. तू नकार दे. आपण भांडण करू. ही रिकामी बंदूक आहे. मी तुझ्यावर गोळी झाडण्याचे नाटक करीन. त्यानंतर तू खाली पड. शाहरुखने मला म्हटले की, मला आता हे सगळं करायचं नाहीये. कारण मी थकलो आहे.”

हेही वाचा: घटस्फोटाच्या घोषणेनंतर ए आर रेहमान यांची पहिली पोस्ट; म्हणाले, “३० वर्षे पूर्ण करू अशी आशा होती, पण…”

पुढे याबाबत अधिक सांगताना सलमान खानने म्हटले, “माझा भाऊ सोहेल तिथेच होता. मी शाहरुखचा हात ओढला. सोहेलने त्याला त्याच्याकडे ओढला. शाहरुखनं मला ढकललं, मीसुद्धा त्याला ढकललं. आमच्यात भांडण सुरू झालं. मी बंदूक बाहेर काढून, गोळी झाडली आणि शाहरुख खाली पडला. आमचे दिग्दर्शक थरथरत होते. १० मिनिटे मी रागात असल्याचे दाखवत होतो. कोणी उठणार नाही, सगळ्यांना मारेन, असे रागात म्हणत होतो. राकेशजींचा हात थरथरायला लागला. मी म्हटलं, शाहरुख उठ, शाहरुख उठ. मी हाक मारल्यानंतरही शाहरुख उठला नाही तेव्हा भिखूदादा आणि सोहेल घाबरले. मी माझ्याजवळची बंदूक बघितली. अचानक शाहरुखच्या घोरण्याचा आवाज आला. तर, पठाण जिवंत होता. मी अजून दोन-तीनदा गोळी झाडली आणि सगळे जण हसू लागले”, अशी आठवण सलमान खानने सांगितली होती.

दरम्यान, शाहरुख आणि सलमान खान यांच्या चित्रपटांबरोबरच प्रेक्षकांना त्यांची खऱ्या आयुष्यातील मैत्रीदेखील आवडत असल्याचे पाहायला मिळते.

Story img Loader