अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पती आदिल खानच्या अफेरचा खुलासा केल्यानंतर राखीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ओशिवारा पोलिसांकडून त्याला मंगळवारी (७ फेब्रुवारी) अटक करण्यात आली. आता आदिलला १४ दिवस न्यायलयीन कोठडीत आहे.

आदिलला न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर आज राखीने कोर्टात हजेरी लावली. यावेळी राखीने पापाराझींना प्रतिक्रिया दिली आहे. ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन राखीचा नवीन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राखीने तिची प्रतिक्रिया दिली आहे. “आदिलला जामीन मिळू नये म्हणून मी आज कोर्टात आले आहे. आदिलने मला फसवलं आहे. त्याने माझ्यावर अत्याचार केले आहेत. मी सगळे पुरावे कोर्टाला दिले आहेत. आदिलला जामीन मंजूर होऊ नये, असं मी न्यायाधिशांना सांगणार आहे. त्यासाठीच मी कोर्टात आले आहे”, असं राखी म्हणाली आहे.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Nikita Singhania, wife of Atul Subhash, involved in controversy.
Atul Subhash : कोण आहे अतुल सुभाष यांची पत्नी निकिता? जिच्यावर २४ पानांचे आरोप करत पतीने संपवले होते जीवन
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

हेही वाचा>> किरण मानेंना लॉटरी लागली! महेश मांजरेकरांबरोबर करत आहेत शूटिंग; सेटवरील फोटो शेअर करत म्हणाले…

राखीने आदिलवर केलेल्या दीड कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाबाबतही भाष्य केलं. ती म्हणाली, “मी बँक स्टेटमेंटसह सगळे पुरावे दिले आहेत. त्याने जबरदस्ती माझ्या फोनमधून ओटीपी घेऊन व्यवहार केले आहेत. त्याने मला फसवलं आहे”.

हेही वाचा>> Video: “बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेन्झ…” आदिलने वाचला राखी सावंतकडे असलेल्या गाड्यांचा पाढा, जुना व्हिडीओ व्हायरल

राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. फसवणुकीबरोबरच आदिलने मारहाण केली अल्याचंही राखीने म्हटलं आहे. राखीने आदिलच्या अफेअरबाबत खुलासा केल्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडचं नावही कॅमेऱ्यासमोर जाहीर केलं होतं.त्यानंतर आदिल व त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Story img Loader