हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिच्या आईचे निधन झाले, तर त्यानंतर तिच्या वैवाहिक जीवनात अडचणी सुरू झाल्या. आता त्या सर्व दुःखाला मागे सारून ती पुन्हा एकदा तिच्या कामाकडे लक्ष देऊ लागली आहे. आता अशातच तिचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.
राखी सावंतने रमजानच्या महिन्यात रोजा ठेवला. मध्यंतरीच तिने तिचा रोजा चुकून मोडल्याचं सांगितलं. त्यावरून तिला बरंच ट्रोलही करण्यात आलं. आता राखीचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. एअरपोर्टवर सेहरी करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे.
आणखी वाचा : Video: “मला आई व्हायचं होतं पण त्याने…” राखी सावंतचा आदिल खानबद्दल मोठा खुलासा
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राखी एअरपोर्टवर नाश्ता करताना दिसत आहे. तिने तेथील दुकानदाराकडून इडली सांबार विकत घेतलं. त्यानंतर राखीने त्याला “पैसे किती झाले?” असं विचारल्यावर दुकानदार तिला ६०० रुपये झाल्याचं म्हणाला. त्याने सांगितलेली ही रक्कम ऐकून राखी आवाक् झाली. ती म्हणाली, “तू वेडा झाला आहेस का? एका प्लेटमधील एक इडलीसाठी आणि एक वड्यासाठी हा ६०० रुपये मागत आहे. तो मला मूर्ख बनवत आहे.” यानंतरच्या दुकानदाराने “तुम्ही घेतलेला इडली वडा, पाण्याची बाटली आणि मँगो ज्यूस या सगळ्याचे एकत्रित मिळून ६०० रुपये झाले आहेत,” असं तिला सांगितलं.
आता तिचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला असून या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा नेटकरी तिला ट्रोल करू लागले आहेत. अनेकांनी कमेंट करत तिच्या या ड्रामेबाजीवर टीका केली. तर आता या व्हिडिओमुळे राखी पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.