Rakhi Sawant Birthday Celebration : बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतचा काल वाढदिवस होता. सध्या ती दुबईमध्ये आहे आणि तिथेच तिने मोठ्या दणक्यात आपला वाढदिवस साजरा केला आहे. सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राखीच्या या बर्थडे पार्टीमध्ये ‘बिग बॉस’फेम शिव ठाकरे आणि अभिनेता विशाल कोटियनदेखील सहभागी झाला होता.
राखी काही महिन्यांपासून दुबईमध्ये राहत आहे. त्यामुळे येथेच तिने वाढदिवस साजरा केला. आता राखी ४६ वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसाला अनेक चाहते आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. या सर्वांसाठी राखीने जंगी पार्टीचे आयोजन केले होते. सेलिब्रेशच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राखीने तीन थरांचा मोठा केक कापला होता. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.
हेही वाचा :अर्जुन कपूरने ‘सिंगल’ आहे, असं म्हटल्यानंतर मलायका अरोराची ‘ती’ पोस्ट चर्चेत
राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच, “माझ्या मित्र परिवारासह दुबईमध्ये वाढदिवसाचे सेलिब्रेशन, धन्यवाद संपूर्ण सृष्टी, धन्यवाद माझे मित्र, धन्यवाद आई…”, अशी कॅप्शन राखीने या पोस्टवर लिहिली आहे.
राखीने आज बॉलीवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे. ती प्रत्येक मुद्द्यावर तिचे स्पष्ट मत सांगते. ड्रामा क्वीन राखी सावंतची आज विशेष ओळख सांगण्याची गरज नाही. मात्र, सिनेविश्वात पदार्पण करताना तिने अनेक अडचणींचा सामना केला. कुटुंबातून तिच्या या करिअरला विरोध होता. त्यासाठी राखी घर सोडून मुंबईला आली. सुरुवातील ऑडिशन देताना तिला अनेक अडचणी आल्या, असे तिने अनेकदा तिच्या मुलाखतींमधून सांगितले आहे.
१९९७ मध्ये आलेल्या ‘अग्निचक्र’ या चित्रपटातून ती रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा झळकली. त्यानंतर राखी ‘दिल का सौदा’, ‘चुडैल नंबर १’, ‘जोरू का गुलाम’, ‘ना तुम जानो ना हम’, ‘२ ऑक्टोबर’, ‘पैसा वसूल’, ‘मै हूं ना’, ‘मस्ती : सनम तेरी कसम’, ‘बुढ्ढा मर गया’, ‘दिल बोले हड्डीप्पा’ अशा अनेक चित्रपटांतून ती झळकली आहे.
हेही वाचा : ‘बिग बॉस ओटीटी २’ फेम अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, भावुक पोस्ट करत मागितली माफी, म्हणाली…
राखीने अनेक आयटम साँग्सही केलेत. २००४ मध्ये आलेला ‘सातच्या आत घरात’ या मराठी चित्रपटातील ‘हिल पोरी हिला’ या गाण्याने राखी प्रसिद्धी झोतात आली. ‘परदेसीया’, ‘देखता है तू क्या’ या गाण्यांमुळे राखीच्या चाहत्यांमध्ये मोठी भर पडली.