अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती आदिल खानचं अफेअर असल्याचा खुलासा राखीने केला होता. त्यानंतर आदिलविरोधात तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आता आदिल तुरुंगात आहे. राखीने आदिलवर फसवणूक, पैसे चोरणे व अश्लील व्हिडीओ बनवल्याचे गंभीर आरोप केले होते.
गेल्या महिन्याभरात राखीच्या आयुष्यात उलथापालथ झाली आहे. आदिलबरोबर राखीने कोर्ट मॅरेज केलं होतं. याचा खुलासा लग्नाच्या सहा महिन्यांनंतर तिने केला होता. अनेक दिवसांच्या ड्राम्यानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं. याचदरम्यान राखीच्या आईचं निधन झाल्यामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. राखीच्या आयुष्यावर आधारित झुठा हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याच्या प्रमोशन इव्हेंटमधील राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
हेही वाचा>> Video: स्टेजवर गात होता एमसी स्टॅन, गर्दीतून कुणीतरी बाटली फेकली अन्…; कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन राखीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इव्हेंटदरम्यान राखीला अचानक रडू कोसळलं. रडत रडत राखी खाली कोसळली. बाजूला उभ्या असलेल्या कलाकारांनी राखीला सावरलं. राखी म्हणाली, “राखी सावंतला कोण धोका देऊ शकतं? तिच्याबरोबर काय वाईट होऊ शकतं? असं लोक म्हणतात. मी माणूस नाही का? मला संसार नको आहे का? मलाही हृदय आहे”, असं राखी या व्हिडीओत म्हणत आहे.
हेही वाचा>> ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पंतप्रधान मोदी हजेरी लावणार? अभिनेता खुलासा करत म्हणाला…
राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी राखीला ट्रोल केलं आहे. “बस कर राखी, एवढी ओव्हर अॅक्टिंग कोण करतं?”, असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “५० रुपया काट ओव्हर अॅक्टिंग का”, असंही एकाने म्हटलं आहे. “हिला कोणीतरी ऑस्कर द्या” अशी कमेंटही केली आहे.