अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान यांच्यादरम्यान गेले काही दिवस वाद सुरू आहे. आदिलने मारहाण केल्याचे आणि त्याचं अफेअर असल्याचे आरोप राखीने केले होते, त्यानंतर तिने पोलिसांत तक्रारही दिली होती. राखीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आदिलला अटक करून कोर्टात हजर केलं आहे. अशातच राखीच्या भावाने आदिलच्या वैयक्तिक आयुष्याबदद्ल गौप्यस्फोट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Video : आदिल खानने राखी सावंतला केली मारहाण, तिच्या भावानेच दाखवले अंगावरील जखमांचे फोटो, पाहून तुमचाही होईल संताप

“राखी सध्या खूप कठीण काळातून जात आहे. आदिल आधीच विवाहित होता, याबद्दल राखीला आजच कळालं आहे. आदिलने अनेक मुलींचं आयुष्य बरबाद केलंय. आदिलने फसवणूक केलेल्या ३-४ मुलींचे फोन राखीला आले आहेत. आम्ही त्या मुलींची नाव सांगू शकत नाहीत. कारण, त्याने आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता. आदिल चोर आहे, त्याने राखीची गाडी आणि पैसे घेतले. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून आम्हाला त्याबद्दल आताच कळतंय,” असं राखीचा भाऊ राकेश याने सांगितलं.

Video : …अन् बोलता बोलता जमिनीवर कोसळली राखी सावंत, पती आदिल खानच्या अटकेनंतर अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

“राखी ड्रामा क्वीन नाही, तर आदिल खान फसवणूक करणारा निघाला. तो चोर आहे. त्याने राखीला खूप वाईट पद्धतीने मारलंय. राखी खूप हिंमत ठेवून लढत आहे, असं काही घडल्यास कोणत्याही मुलीने घाबरून जाऊ नये, सहन करू नये, हिमतीने सामना करावा,” असंही राखीचा भाऊ म्हणाला.

दरम्यान, राखीच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलला अटक केली होती. त्यानंतर आज त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं आहे.