बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही कायमच काही ना कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत आणि तिचा दुसरा पती आदिल खान यांच्यात वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आहे. तर दुसरीकडे तिचे नवीन एक गाणे प्रदर्शित झाले आहे. नुकतंच राखी सावंत ही लंडनवरुन मुंबईत परतली. यावेळी विमानतळावरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात राखी ही केएल राहुल कोण? असे विचारताना दिसत आहे.
राखी सावंतचा हा व्हिडीओ विरल भय्यानीने शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला राखी सावंत ही पापाराझींबरोबर लंडन ट्रीपबद्दल चर्चा करताना दिसत आहे. “मी १२ तास प्रवास करुन लंडनवरुन परतली आहे”, असे ती पापाराझींना सांगताना दिसत आहे.
आणखी वाचा : “हिने डायपर का घातलाय?” जिममधील कपड्याच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे राखी सावंत ट्रोल
त्यावेळी तिथे केएल राहुलही उपस्थित होता. यावेळी अनेक पापाराझी तिला गाडीत केएल राहुल असल्याचे सांगतात. यावर ती पापाराझींना “त्या गाडीत कोण आहे?” असे विचारते. त्यावर पापाराझी तिला ‘केएल राहुल’ असं सांगतात. यावर ती “तो कोण आहे”, असे विचारते.
यानंतर तिला पापाराझी ‘क्रिकेटर’ असे सांगतात. त्याबरोबर तो सुनील शेट्टी यांचा जावई असल्याचेही तिला सांगतात. यानंतर तिला केएल राहुल कोणय़ याची आठवण होते. यावर ती ‘अच्छा’ असे म्हणत त्याला लग्नासाठी शुभेच्छा देते. राखी सावंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यावर अनेक युजर्स कमेंटही करताना दिसत आहे.
आणखी वाचा : “मला एक संधी दे…” जेलमध्ये असलेल्या आदिलचा राखी सावंतला फोन, म्हणाली “मी तुझ्या पाया…”
दरम्यान अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने जानेवारी २०२३ मध्ये क्रिकेटपटू केएल राहुलसोबत लग्नगाठ बांधली. ते दोघं खंडाळा फार्महाऊसवर विवाहबंधनात अडकले. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.