ड्रामा क्वीन राखी सावंतने काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाची बातमी दिली. तिने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीबरोबर लग्न केल्याचा खुलासा केला. त्यानंतर आदिल लग्न स्वीकारत नव्हता त्यामुळे राखीने बराच गोंधळही घातला होता. पण अखेर आदिलनेही लग्नाची कबुली दिली. अशातच राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती रितेश याने राखीबाबत वक्तव्य केलं आहे. राखी हे सर्व काही केवळ प्रसिद्धी आणि सहानुभूतीसाठी करते, असं रितेशचं म्हणणं आहे.

Video: सलमान खानने अचानक घेतली आमिर खानची भेट; सात वर्षांनी दोघांमधील वाद संपला? भेटीचं नेमकं कारण काय

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

‘जनसत्ता’शी साधलेल्या संवादात रितेशने राखी सावंतबद्दल खुलासा केला. रितेश म्हणाला, “राखी सावंत जे काही करते, ती केवळ प्रसिद्धीसाठी करते, सहानुभूती मिळविण्यासाठी करते. मी एवढेच सांगेन की तिच्याकडून ज्या काही बातमी येत आहे, त्या १००% फक्त मसाला आहे आणि बाकी काही नाही.”

“…म्हणून मी कायम आईचं मंगळसूत्र घालतो”, प्रसिद्ध गायकाने केला खुलासा

पुढे रितेश म्हणाला, “कधी ती ख्रिश्चन धर्म स्वीकारते, तर कधी मुस्लीम बनते हे तुम्ही पाहिलं असेलच. तिला हिंदू सण साजरे करताना तुम्ही पाहिलं नसेल. बॉलिवूडमध्ये एक खास प्रकारची लॉबी आहे, ज्यामध्ये या गोष्टी मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. बरेच हिंदू कलाकार धर्मांतर करत आहेत. एक लॉबी या धर्मांतर करणार्‍यांचे समर्थन करते. मला देशाचे लक्ष याकडे वेधायचे आहे,” असं तो म्हणाला.

“राखी चांगली पत्नी बनू शकते की नाही, यावर मी काहीही बोलू शकत नाही. पण हो! तिने जरा समजदार व्हावं आणि मॅच्युअर व्हावं. तुम्हाला कोणतंही नातं टिकवून ठेवण्यासाठी विश्वास, वचनबद्धता आणि प्रायव्हसी आवश्यक असते. पण, राखी असं करत नाही. ती प्रत्येक गोष्टीबद्दल बोलते. मग ते बिग बॉसचे घर असो वा माध्यमांसमोर, ती फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी हे करते. पुढच्या माणसाला ती गोष्ट आवडते की नाही, याचा विचार ती करत नाही,” असं रितेश राखीबद्दल म्हणाला.

राखीच्या आईची प्रकृती चिंताजनक आहे. यावर त्या लवकर बऱ्या व्हाव्या, यासाठी रितेशने प्रार्थना केली. तसेच राखी काय करतेय, याचं भान तिला असायला हवं, असंही तो म्हणाला.

Story img Loader