अभिनेत्री राखी सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी मुस्लीम पद्धतीने लग्न केलंय. तिने आदिलशी लग्न करण्यासाठी तिचं नाव बदलून फातिमा ठेवलं आहे. पण, राखीचं हे पहिलं लग्न नाही, यापूर्वी तिने रितेश नावाच्या व्यक्तीबरोबर लग्न केलं होतं. पण त्याचं आधीच लग्न झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर राखी व रितेश राज वेगळे झाले होते. दरम्यान, आता राखीने आदिलबरोबर लग्न केल्यावर रितेशने राखीबद्दल काही खुलासे केले आहेत.

“ती कधी मुस्लीम तर कधी…” राखी सावंतच्या लग्नाबद्दल पहिल्या पतीची प्रतिक्रिया

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?

‘जनसत्ता’शी बोलताना रितेश म्हणाला, “राखी चांगली पत्नी बनू शकते की नाही, यावर मी काहीही बोलू शकत नाही. पण हो! तिने जरा समजदार व्हावं आणि मॅच्युअर व्हावं. तुम्हाला कोणतंही नातं टिकवून ठेवण्यासाठी विश्वास, वचनबद्धता आणि प्रायव्हसी आवश्यक असते. पण, राखी असं करत नाही. ती प्रत्येक गोष्टीबद्दल बोलते. मग ते बिग बॉसचे घर असो वा माध्यमांसमोर, ती फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी हे करते. पुढच्या माणसाला ती गोष्ट आवडते की नाही, याचा विचार ती करत नाही,” असं म्हणत रितेशने राखीवर टीका केली.

“…म्हणून मी कायम आईचं मंगळसूत्र घालतो”, प्रसिद्ध गायकाने केला खुलासा

राखीला प्रसिद्धीची सवय आहे आणि ती चर्चेत राहण्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याचा वापर करते, असं रितेश म्हणाला. तिने जगासमोर स्वतःची चेष्टा करणं थांबवावं आणि थोडं समजदार व्हावं, अशी अपेक्षाही रितेशने व्यक्त केली. राखीची आई सध्या रुग्णालयात दाखल आहे, त्यांना ब्रेन स्ट्रोक आणि कर्करोग झाला असून उपचार सुरू आहेत, यावर त्या लवकर बऱ्या व्हाव्या, यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचंही रितेश म्हणाला.

Story img Loader