बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत गेले अनेक दिवस तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षीच राखीने तिचा बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर लग्न केल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच केला. तर आता सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिचे काही ना काही व्हिडिओ पोस्ट करत आहे. काल अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा जन्मदिन होता. त्यानिमित्त राखीने आज तिचा एक व्हिडीओ पोस्ट करत त्याला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचा इतका सामना करावा लागला की अखेर तिने तो व्हिडीओ काही वेळातच डिलीट केला.

राखी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आदिलबरोबर ती तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये असलेल्या तिच्या आईच्या प्रकृतीची माहितीही ती सोशल मीडियावरून शेअर करत आहे. काल झालेल्या सुशांत सिंह राजपूतच्या जन्मदिनानिमित्त तिने आज त्याला व्हिडीओमार्फत शुभेच्छा दिल्या.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Veteran Telugu Actor Mohan Babu
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

आणखी वाचा : वयाच्या ४४ व्या वर्षी राखी सावंत गरोदर? प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली…

आज राखीने तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. यावेळी ती झोपाळ्यावर बसून सुशांत सिंह राजपूतच्या जन्मदिनानिमित्त ‘हॅपी बर्थडे टू यू’ हे गाणं गाताना दिसत होती. त्यानंतर “देवाचे आशीर्वाद तुला कायम लाभत राहोत. आम्हा सगळ्यांना तू खूप आठवण येत आहे,” असं तिने म्हटलं. तर या व्हिडीओत तिने सुशांतच्या ऐवजी त्याचं नाव शुशांत असं उच्चारलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली.

हेही वाचा : राखी सावंतला दुसऱ्याबरोबर रोमान्स करताना पाहून भडकला आदिल खान, प्रकरण गेले मारामारीपर्यंत

या व्हिडीओवर कमेंट ही एकाने लिहिलं, “त्याचा जन्मदिन आज नाही, काल होता.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “त्याचं नाव सुशांत आहे. शुशांत नाही.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “कोणीतरी हिला थांबवा…” त्यामुळे राखीने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. पण अनेक नकारात्मक प्रतिक्रियांमुळे तिने हा व्हिडीओ लगेचच डिलीट केला.

Story img Loader