बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर कायमच चर्चेत असल्यांच पाहायला मिळतं. राखी अनेकदा तिचे फोटो व व्हिडीओही शेअर करताना दिसते. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती क्लबमध्ये डान्स करताना दिसत आहे.
राखीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती हुक्का पिताना दिसत आहे. एका हातात हुक्का घेऊन क्लबमध्ये राखी डान्स करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी राखीला ट्रोल केलं आहे.
हेही वाचा>> लग्नानंतर बायकोला परदेशात फिरायला घेऊन जाणार दत्तू मोरे, हनिमूनचा प्लॅन सांगत म्हणाला…
“२-३ दिवसांपूर्वी तू मुस्लीम होतीस ना?” अशी कमेंट केली आहे. “मुस्लीम आहेस तर त्यांच्यासारखी राहा. असे घाणेरडे कपडे घालून आमच्या धर्माला खराब करू नकोस,” अशी कमेंटही केली आहे.
हेही वाचा>> दत्तू मोरेच्या लग्नाला होता सासऱ्यांचा विरोध, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “पळून जाणं..”
“पार्टी करायला पैसे आहेत. पण, आईच्या उपचारासाठी अंबानीकडे पैसे मागत होती,” असंही एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “सनाकडून काहीतरी शिकून घे…” अशी कमेंट केली आहे.
“ड्रेस किती वाईट घातला आहे”, असंही एकाने म्हटलं आहे.
दरम्यान, राखी सावंतने दुबईमध्ये डान्स अकॅडमी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी पती आदिल खानबरोबरच्या वादामुळे ती चर्चेत होती. आदिलवर तिने अनेक गंभीर आरोप केले होते.