राखी सावंत व तिचा पती आदिल खान दुर्रानीमधील वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. राखीने पती आदिल खान विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ७ फेब्रुवारी (मंगळवारी) आदिलला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आदिलच्या अटकेनंतर राखीने त्याच्यावर गंभीर आरोपही केले. आदिल राखीला मारायला तिच्या घरी गेला होता असं तिचं म्हणणं होतं. आता आदिलचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Video : …अन् बोलता बोलता जमिनीवर कोसळली राखी सावंत, पती आदिल खानच्या अटकेनंतर अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आता आदिलला अंधेरी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आहे. यादरम्यानचा आदिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आदिलला अंधेरी कोर्टामध्ये घेऊन जात असताना पापाराझी छायाचित्रकारांनी त्याला घेरलं. यावेळी त्याला ओढत कोर्टाकडे घेऊन जात असतानाचं चित्र पाहायला मिळालं.

मात्र यावेळी आदिलने आपला चेहरा लपवला होता. त्याने मास्कने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. आदिलने तोंड लपवल्यामुळे नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. आता तोंड का लपवलं? दुसरा मास्क मिळाला नाही का?, राखीमुळे आदिलवर ही वेळ आली आहे अशा संमिश्र प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

आणखी वाचा – Video : …अन् त्याक्षणी ढसाढसा रडली होती जिनिलीया देशमुख, लग्नाचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आदिलने राखीला मारहाण केल्याचे काही फोटो तिच्या भावाने प्रसारमाध्यमांसमोर दाखवले आहेत. तर आदिलचं दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर असल्याचं म्हणत राखीने त्याच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. इतकंच नव्हे तर आईच्या निधनाला जबाबदार आदिल असल्याचं राखीचं म्हणणं आहे. आता या दोघांमधील वाद आणखीन किती वाढणार? हे येणार काळच सांगू शकेल.