राखी सावंत आणि तिचा ड्रामा हा नेहमी चर्चेचा विषय असतो. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. पती आदिल खानने तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. एवढंच नाही तर तिची चांगली मैत्रीण जयश्री मोरे, अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी देखील राखीवर अनेक आरोप केले. अशा आरोपांच्या जाळ्यात अडकलेली राखी काही दिवस अबाया परिधान करून फिरताना दिसली. पण आता राखी सैनिकांचा गणवेश परिधान करून रस्त्यावर उतरली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना चीन किंवा पाकिस्तानमध्ये पाठवण्यासाठी विनंती करत आहे.
हेही वाचा – अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं शिक्षण किती झालंय माहितीये? जाणून घ्या…
‘बॉलीवूड नाउ’ या एंटरटेन्मेंट इन्स्टाग्राम पेजवर राखी सावंतचा हा नवा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, राखी सैनिकांच्या गणवेशात दिसत आहे. तसेच तिनं हातात खोटी बंदूक घेतलेली पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विनंती करताना दिसत आहे.
या व्हिडीओत राखी म्हणतेय की, “माननीय मोदीजी मी तयार आहे. मला तुम्ही चीनला पाठवा किंवा पाकिस्तानला पाठवा. मला कुठे वाटेल तिथे पाठवा. मी आपल्या देशाच रक्षण करण्यासाठी तयार आहे. आता कोणीही माझ्या मधे आलं तर तंदूरी चिकन बनवेन.”
राखीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आदिल भाई तू या बेचारीची काय हालत केली आहेस’, ‘हिला कोणीतरी वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा. नाहीतर ही सर्वांना वेड करेल.’ ‘चीन किंवा पाकिस्तान पूर्वी हिला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी राखीच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.
हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा चिमुकला लेक लाटतोय पोळ्या; पाहा व्हिडीओ
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राखीने आपल्या जीवनावर आधारित चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. या चित्रपटासाठी अभिनेत्री आलिया भट्ट आणि विद्या बालनला विचारलं असल्याच देखील तिनं सांगितलं होतं.