अभिनेत्री राखी सावंतच्या संसारात वादळ आलं आहे. आदिलला अटक झाल्यानंतर राखी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ओशाविरा पोलिसांनी त्याला मंगळवारी (७ फेब्रुवारी) अटक केली होती. त्यानंतर आदिल आता १४ दिवस न्यायालयीन कोठडीत असणार आहे.
आदिलला अटक झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राखीने कोर्टात हजेरी लावली होती. कोर्टातून बाहेर आल्यानंतरचा राखीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत तिच्या वकिलांच्या पाया पडताना दिसत आहे. राखीचा हा व्हिडीओ विरल भय्यानी या पापाराझी अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आदिलच्या अटकेनंतर राखीच्या वकिलांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा>> “ए शेंबडी…” ‘बिग बॉस’ फेम एमसी स्टॅनसाठी उर्फी जावेदने केलेलं ट्वीट चर्चेत
“आदिलविरोधात इतके पुरावे आहेत की त्याच्यावर फक्त ४९८ किंवा ३७७ नाही तर आणखी आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. पती-पत्नीच्या नात्यात कोणताही पडदा नसतो. पण राखीच्या पर्समधून आदिलने दागिने घेतले असतील तर ती चोरी नाही तर गुन्हा आहे”, असं राखीच्या वकिलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा>> Video: आदिल खानच्या अटकेनंतर पहिल्यांदाच कोर्टात पोहोचली राखी सावंत, म्हणाली “त्याला जामीन…”
हेही वाचा>> Video: सिद्धार्थ-कियाराने लग्नानंतर वाटली मिठाई; अभिनेत्रीच्या साध्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष
राखीने वकील व मुंबई पोलिसांचे आभारही मानले आहेत. न्याय मिळेल असा विश्वासही राखीने व्यक्त केला आहे. राखीने आदिल खानवर फसवणुकीसह मारहाण केल्याचा आरोपही केला आहे. आदिलच्या अफेअरबाबत खुलासा केल्यानंतर राखीने पोलिसांत तक्रार केली होती.