अभिनेत्री राखी सावंतच्या दुसऱ्या वैवाहिक जीवनात वादळ आलं आहे. नुकतंच राखीने तिचा पती आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा गंभीर खुलासा केला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात असताना आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू असल्याचंही राखी म्हणाली आहे. त्यानंतर आता राखीने त्या मुलीबरोबर आदिललाही थेट धमकी दिली आहे. तसेच त्या मुलीबद्दलही भाष्य केले आहे.
मॉडेल व अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच तिच्या आईचं निधन झालं. त्यानंतर आता राखीने तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत नवा ड्रामा सुरू झाला आहे. राखीने आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा केला आहे. राखीचे काही व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केले आहेत. त्यावेळी बोलताना राखीने आदिलला थेट धमकी दिली आहे.
आणखी वाचा : गळ्यात वरमाला, हातात मॅरेज सर्टिफिकेट; नवविवाहित राखी सावंतच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?
“माझ्या एक-एक अश्रूंची परतफेड माझा देव, माझा अल्लाह नक्कीच घेईल. जर मी गप्प बसून ऐकून घेऊ शकते, तर मग मी तोंड उघडून मी माझ्या स्वाभिमानासाठी आणि माझं लग्न वाचवण्यासाठी लढूही शकते. मी तुला सक्त ताकीद देतेय की मी तुझ्या सर्व गोष्टी उघड करेन. तसेच ती जी कोणी मुलगी आहे, तिलाही मी सांगू इच्छिते की तू माझ्या आणि आदिलमध्ये एका नवरा बायकोमध्ये अजिबात येऊ नकोस”, असा इशारा राखीने त्या मुलीसह आदिलला दिला आहे.
“तुला लाज वाटायला हवी. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्धवस्त करतेस. पुरुष तर तसेच असतातच. त्यांची वृत्तीच तशी असते. पण तू एका लग्न झालेल्या स्त्रीचे आयुष्य उद्धवस्त करतेस. मी अजूनही तुझे नाव घेतलेले नाही. तुझे व्हिडीओ व्हायरल केलेले नाहीत.
आदिल मी तुलाही सांगतेय की आतापासून तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाक. तू मला दोन-चार लग्न करेन अशा धमक्या देशील आणि मी दुसऱ्या स्त्रियांप्रमाणे गप्प बसून राहिन, असं वाटतं असेल तर तसं होणार नाही”, असेही राखीने यावेळी म्हटले.
आणखी वाचा : “तिला नेहमी वाटायचं की…” आईच्या निधनानंतर राखी सावंतचा मोठा खुलासा
दरम्यान राखी सावंत आणि आदिल खानने मे महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. परंतु, लग्नाच्या सात महिन्यांनी राखीने तिच्या लग्नाचा खुलासा केला होता. तेव्हाही बऱ्याच दिवसांच्या ड्रामानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं. आदिलच्या अफेअरमुळे संसारात वादळ आल्याचं राखीने म्हटलं आहे.